नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रियांका गांधी एका आठवड्यात नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर ४२ मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहणार आहेत. प्रियंका गांधी यांनी सर्व सामान गुरुग्राम येथील घरात हलवलं आहे. घराची सुरक्षेबाबतही सर्व तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या राजकीय बैठकींसाठी त्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाचा वापर करणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलेल आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी याना शासकीय घर सोडण्याबद्धलची नोटीस दिली होती त्याबद्धल शरद पवार यांनीही केंद्र सरकार वर टीका केली होती, ते म्हणाले कि , प्रियांका गांधी या नेहरू घराण्यातला वारसा हक्क आहे. पंडित नेहरू यांनी देशासाठी खूप काम केले आहे. त्यांची मुलगी असलेल्या इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी यांनी देशासाठी प्राण दिला त्यानंतर काँग्रेस पक्षाची घडी सोनिया गांधी यांनी बसवली. प्रियंका गांधी या हि त्यांचा एक भाग आहे.देशासाठी काम करणाऱ्या लोकांना झेड प्लस सुरक्षेची गरज हि असतेच गेल्यावर्षी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती हे सर्व अन्यायकारक आहे. असेही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका गांधी यांच्या वास्तव्यासाठी नवी दिल्लीतील दोन तीन ठिकाणी भाड्याचं घर पाहण्यात आलं आहे. यापूर्वी त्या लखनौमध्ये वास्तव्यास जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यापैकी सुजान सिंह पार्क नजीक असलेल्या एका घरात त्या वास्तव्यास जातील अशी अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी घराच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे.
यापूर्वी प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार १९९७ पासून त्या नवी दिल्लीतील लोढी इस्टेटच्या ३५ क्रमांकाच्या बंगल्यात वास्तव्यास होत्या. गेल्या वर्षी त्यांची एसपीजी सुरक्षा हटवून झेड+ करण्यात आली होती. १ जुलै रोजी त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना ३१ जुलैपर्यंत हा बंगला रिकामा करावा लागणार होता.निवडणुकांच्या पार्श्वभूंमीवर प्रियंका गांधी या आपला सर्वाधिक वेळ उत्तर प्रदेशातच घालवणार आहे. ऑगस्ट महिन्यात त्या उत्तर प्रदेशचा दौरा करू शकतात अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रानं दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.