हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची नोंदणी करणे अगदी सोपे आहे. या गॅस कनेक्शन साठी BPL परिवारातील कोणतीही महिला अर्ज करू शकते.
ही योजना १ मे २०१६ रोजी सुरु करण्यात आली होती. pmujjwalayojana.com या वेबसाईटवर जाऊन या योजनेची सर्व माहिती घेता येऊ शकते. या कनेक्शन साठी एक अर्ज भरून जवळच्या एलपीजी वितरकाकडे द्यायचा आहे. अर्जासोबतच्या पत्रात महिलेला आपला पूर्ण पत्ता, जनधन बँक खाते आणि परिवारातील सदस्यांचा आधार नंबर द्यायचा आहे. या मागणीची प्रक्रिया केल्यावर देशातील तेल कंपन्या योग्य लाभार्थ्याला एलपीजी कनेक्शन जारी करतात. जर कुणी हप्त्याचा पर्याय निवडला तर हप्त्याची रक्कम सबसिडीवर ऍडजस्ट केली जाते.
उज्जवला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन साठी स्टोव्ह सहित ३२००रु किंमत असते. यातील १६००रुपयांची सबसिडी थेट सरकारकडून दिली जाते. बाकीची रक्कम तें कंपन्या देतात. मात्र ग्राहकांना हप्त्यांच्या रूपात १६००रु तेल कंपन्यांना द्यावे लागतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.