मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी नेते CAA, NRC कायद्यांविरोधात काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात एकत्र आले.
जेएनयू मे जो कुछ हुआ वह योग्य नहीं था, इसलिए हर जगह से उसका विरोध हो रहा है। लोग नाराज है इसलिए आंदोलन हो रहे है। सरकार की दमनशाही को गांधीजी की अहिंसासे हमे जबाव देना है। इसलिए यशवंत सिन्हा जी के आंदोलन को मेरी शुभकामनाएं है, मुझे विश्वास है की लोग इस यात्रा का स्वागत करेंगे। pic.twitter.com/pUFZQ1d63c
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 9, 2020
मुंबई येथे आज गांधी शांतता यात्रेला मोठ्या दिमाखात सुरवात झाली. यावेळी केंद्र सरकारच्या दमनशाहीविरोधान अनेकांनी आवाज उठवला. लोकांना #CAAआणि #NRC बद्दल भीती वाटते. कोणतीही कागदपत्रे नसल्यास, सरकारने बांधलेल्या छावणीत राहावे लागेल अशी भीती लोकांना आहे. आज ही परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे. सरकार दडपशाहीचा प्रयत्न करीत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
देश के वरिष्ठ नेता, पूर्व केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हाजीने केंद्र सरकार द्वारा लागू किये गये सीएए और एनआरसी के खिलाफ गांधी शांति यात्रा का आयोजन किया है। इस यात्रा को महाराष्ट्र के परिवर्तनवादी विचारधारा के नेताओं के साथ हरी झेंडी दिखाई।#CAA_NRC_Protests pic.twitter.com/eEITYjYbLN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 9, 2020
दरम्यान देशात पसरलेल्या या दमनशाहीला शांततेच्या मार्गाने विरोध करण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की या गांधी शांती यात्रेमध्ये बरेच लोक सामील होतील. यात्रेत शांततेत सहभागी व्हावे आणि सरकारसमोर आपले विचार मांडणे हाच एकमेव हेतू असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News
हे पण वाचा –
शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार – रघुनाथदादा पाटील
एकनाथ शिंदे गडचिरोलीचे तर बच्चू कडू अकोल्याचे पालकमंत्री; पहा जिल्हानिहाय पालकमंत्री
ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीचे मन हेलावून टाकणारे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?