हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिलेल्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. “आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालाचा काहीच परिणाम हा महाराष्ट्रावर झालेला नाही. उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे म्हणत असाल तर महाराष्ट्र भी तैयार है,” असे म्हणत थेट आव्हान पवार यांनी महाजन यांना दिले आहे.
उत्तर प्रदेश गोवा, पंजाब या राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार याणी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जे निकाल लागले ते वेगळे लागले आहेत. पंजाबमध्ये तर अपेक्षपेक्षा वेगळे चित्र पहायला मिळाले. दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचा-यांनीही ‘आप’ला मतं दिली होती. पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. 5 पैकी 4 राज्यात भाजपचं राज्य होतं. पंजाबमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तिथला बदल भाजपला अनुकूल नाही. हा बदल काँग्रेसला झटका देणारा आहे.
आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी “उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है,” असे म्हंटले आहे. महाराष्ट्र अभि बाकी है तर महाराष्ट्र भी तैयार है, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी यावेळी दिले आहे. युपीत अखिलेश यादव याची चूक अजिबात वाटत नाही, ते एकटा लढलेत तिथे, जी मत त्याला पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील.
राजकीय जीवनात अशी स्थिती येत असते. 1977 मध्ये देशातील प्रत्येक राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. राजस्थान, पंजाब, दिल्ली, गुजरात, कर्नाटक राज्यात काँग्रेस हरली होती. त्यावेळी काँग्रेस संपली, असं अनेक लोकांनी सांगितलं होतं.1977 ला काँग्रेसला हरवणाऱ्या लोकांनी 1980 ला सत्ता दिली. पाच राज्यातील लोकांचं मत भाजपच्या बाजूनं आहे, असं हे मान्य करावं लागेल. महाराष्ट्र बाकी है म्हणताय तर महाराष्ट्र तैयार है,असे पवार यांनी यावेळी म्हंटले.