धक्कादायक! २१ वर्षाच्या बहीणीकडून १० वर्षाच्या भावाची डोक्यात खलबत्ता घालून हत्या

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील व्यंकटेश कॉलनीतील एका कुटुंबातील सख्ख्या बहिणीने आपल्या भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. भावा-बहिणींमध्ये झालेल्या वादावरून बहिणीकडून भावाची हत्या झाली आहे.

मृत मुलाचे आईवडील काही कामांसाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान या भावाबहिणींमध्ये काही कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात बहिणीने भावाच्या डोक्यात खलबत्ता घातला. खलबत्त्याच्या वाराने भाऊ गंभीर जखमी झालाच पण त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. बहिणीला ताब्यात घेण्यात आले असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत भावाचे वय १० वर्षे तर बहिणीचे वय २१ वर्षे इतके आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here