हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका सहा वर्षाच्या मुलाने खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिरुचिरपल्ली येथील एका गावात ही घटना घडली आहे. इथे ठेवलेल्या गावठी स्फोटकाला खाण्याची वस्तू आहे असं समजून मुलाने चुकून ते खाल्लं. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
अटक केलेल्या त्या तिघांनी कावेरी नदीत मासेमारी करण्यासाठी स्फोटकं आणली होती. यावेळी त्यांनी फक्त दोन जिलेटीन स्फोटकांचा वापर केला आणि न वापरलेले पुन्हा घरी आणून ठेवले. आरोपींमधील एका व्यक्तीचा मुलगा हा त्यावेळी घरातच खेळत होता. ही खायची वस्तू आहे असे समजून त्याने स्फोटकाला तोंडात टाकून चावू लागला. यावेळी त्या स्फोटकाचा त्या मुलाच्या तोंडातच स्फोट झाला. मात्र कोणतीही मदत मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांना कळाले तर आपण अडचणीत येऊ या भीतीने या तीनही आरोपींनी त्या रात्रीच मुलांवर अंत्यसंस्कार केले. मात्र पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या तिघांना अटक केली आणि चौकशीला सुरुवात केली. या स्फोटकांचा अजून कुठे वापर केला जात होता का याची माहिती आता पोलीस घेत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.