पुण्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती सतत खालावत चालली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात किमान १६५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहे.यात मुंबईतील १०७, पुण्यातील १९, ठाण्यातील १३, नागपूरचे ११, नवी मुंबई व वसई-विरार प्रत्येकी दोन, पिंपरी चिंचवड आणि मालेगाव, अहमदनगर, चंद्रपूर आणि पनवेलमधील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. त्याचवेळी पुण्यात उशिरा रात्री एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ४४ लोकांचा बळी गेला आहे.

दुसरीकडे, लॉकडाऊन न पाळणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिस नवीन मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी पुण्यातही असेच काहीसे घडले. येथील लॉकडाऊन दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या लोकांना पोलिसांनी रस्त्यावरच योगासने करायला लावले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बिबवेवाडीतील काही लोक आज सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले.

पोलिसांनी त्या सर्व लोकांना पकडले आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी रस्त्यावरच योग करायला लावले.योग करत असताना सोशल डिस्टसिंग पाळले गेले आणि सर्वांनी आपले चेहरेही झाकून घेतले होते. या दरम्यान त्याचा व्हिडिओही बनविण्यात आला होता.काही महिलाही यात योगा करताना दिसतात. पोलिसांनी सर्वांनी घरातच फिटनेसची काळजी घ्यावी व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.

त्याच वेळी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अशी माहिती दिली की मुंबईच्या धारावी भागात आणखी ११ कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली असून, त्या भागात एकूण कोरोनो व्हायरस पॉझिटिव्हची संख्या आता ७१ झाली आहे.कोरोनामुळे संपूर्ण देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. यावेळी लोकांना फक्त आपत्कालीन आणि आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या वारंवार विनंती करूनही लोक त्याचे पालन करत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment