हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतो आहे. मात्र मोठ्या प्रमाणात सोशल प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी लोक गेले आहेत. त्याचे पडसाद शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर उमटत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्य या विषयावर भाष्य करताना सोशल मीडियाचा आपल्या आहारावर होणारा परिणाम या विषयावरसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. ‘आपण कसे दिसतो’ याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्र असा दृष्टिकोन असतो. मात्र जवळपास ८० टक्के महिला आणि ५० टक्के पुरुष हे स्वतःच्या शरीरयष्टीबाबत नकारात्मक विचार करत असतात, असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. सोशल मीडियामुळे आपण सेलेब्रिटीज आणि आपल्या मित्रमंडळींसोबत स्वतःची तुलना करू लागतो. त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.
सोशल मीडियावर चुकीच्या व्यक्तींना फॉलो केल्यामुळे तुमच्या राहणीमानाच्या सवयींवर वाईट परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञ सूचित करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीपासून जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा मिळत असेल तर त्यांना अनफॉलो करणं उचित ठरेल. सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्तींकडे विविध स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. परिणामी, त्यांची सामाजिक जबाबदारीसुद्धा तितकीच जास्त आहे. त्यांनी जरी त्या क्षेत्रातील शिक्षण घेतलं नसलं तरी बहुतांश व्यक्ती त्यांचं म्हणणं खरं आहे, असं मानतात. सोशल मीडियावरील अनेक लोकप्रिय व्यक्ती त्यांच्या खाण्याच्या सवयी फॉलोअर्ससोबत शेअर करतात. पुढे त्याचं अंधानुकरण केलं जातं. पण, ते आहारशास्त्रानुसार योग्य असेलच असं नाही.
सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या पदार्थांच्या फोटोंकडे आकर्षित होण्याचं प्रमाण अधिक आहे. तसंच अनेक लोकप्रिय व्यक्ती त्यांचं डाएट प्लॅनिंग किंवा त्याविषयी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याचं अंधानुकरण केलं जातं. तसंच सोशल मीडियावरील आहाराविषयक पोस्टचं निरीक्षण केलं तर त्यात एकसूत्रीपणी आहे. म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या अन्नाचं सेवन करण्याचा सल्ला देणाऱ्या पोस्ट असतात. त्यात डाएट ट्रेंडचा प्रामुख्यानं समावेश असतो. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे फक्त एका विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांचं सेवन करणं आरोग्यदृष्ट्या हानिकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शरीरामध्ये काही जीवनसत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in