फुटणाऱ्या आमदारांनो लक्षात ठेवा, गृहखातं माझ्याकडे आहे – अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना सज्जड दम
अजित पवार यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर कुठलाही आमदार फुटला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम दिला आहे.
अजित पवार यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर कुठलाही आमदार फुटला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम दिला आहे.
नागपूर प्रतिनिधी | जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आणि यावरून खुद्द पवार यांनी सूचक असे वक्तव्य केले आहे. नागपुरात सुरु असलेल्या … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांनी दिव्य मराठी या वृत्तपत्राला विशेष मुलाखत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सूचक विधान केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाला तुम्ही तराजूमध्ये कसे ताेलता? या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, अजित हार्ड वर्कर आहे. … Read more
सोलापूरमधील करमाळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका लग्न सोहळ्यात एकमेकांच्या शेजारी बसले होते. राज्यातील सत्तापेच सुटल्यानंतर या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं. संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात ह्या दोघांनी हजेरी लावली असता यावेळी दोघांनी बराच वेळ गप्पाही मारल्या. हा संपूर्ण प्रकार कैमरात कैद होऊन त्याला व्हायरल वळण लागलं. त्यांच्या या चर्चेचा विडिओ माध्यमात प्रसारित झाल्यावर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. पण अखेर अजित पवार यांनीच सर्व उलट-सुलट चर्चांना विराम देत त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचा आज बारामतीत माध्यम प्रतिनिधींसमोर खुलासा केला.
तब्बल एक महिन्याच्या चाललेल्या सत्तानाट्याला अखेर २८ नोव्हेंबर ला पूर्णविराम मिळाला. ‘महाविकासाआघाडी’ने एकत्र येत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. मात्र याच्या काही दिवस आधी सत्ता संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करत सर्वांना जोरदार धक्का दिला. मात्र सत्ता स्थापनेचा दावा न करू शकल्याने अल्पकाळात त्यांचे सरकार कोसळले. मात्र सत्तास्थापनेच्या या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. निम्मित होत माढ्यामधील शाही विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यात हे दोघेही नेते एकत्र बसून चर्चा करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.
मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आज सकाळ पासून सुरु होती. पवार सकाळ पासून अनरिचेबल झाल्याने आता अजित पवार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आपण आज शपथविधी घेणार नसल्याचे पवार यांनी स्वत: जाहिर केले आहे. यावेळी आपण उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होता. मात्र तुम्ही बंडखोरी केल्यामुळेच तुम्हाला … Read more
गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्तास्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्यानं देवेंद्र फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले त्याचबरोबर भाजपने काही तास सत्ता काबीज केली होती. हे बघता उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह तयार झाले होते.
मुंबई प्रतिनिधी | राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचे नावही निश्चित झाले आहे. बुधवारी रात्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असून अजित पवार आणि जयंत … Read more
विशेष प्रतिनिधी | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असले तरी अद्याप खातेवाटपावरुन खलबते कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील खातेवाटपाच्या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यशवंतराव चव्हाण सेंटर मधील काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक तब्बल तीन तासांनी संपली. मात्र खातेवाटपाबाबत कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबत आग्रही असल्याचं … Read more
मुंबई प्रतिनिधी । आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक वेगवान घडामोडी घडणारा ठरला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. अजितदादा यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत नसल्याने आम्ही सत्तेमध्ये राहु शकत नाही, असे कारण पुढे करत फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस म्हणालेत, “काही … Read more