पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…! धनंजय मुंढेंचा आशिष शेलारांना टोला

पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत  राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे. 

आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

‘राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे’ अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे होता. हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेसाठी बैठका घेत आहे. या तिन्ही पक्षात होणाऱ्या चर्चां म्हणजे तीन अंकी नाटक आहे. आशिष शेलार यांच्या नव्यानं सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महासेनाआघाडीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेकडून शेलार यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.