कराडकरांसाठी गुड न्यूज! आता कृष्णेतच होणार कोरोना चाचणी; रिपोर्टसाठी पुण्याची गरज नाही

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अभिमत विश्वविद्यालय, कराड यांना कोविड-19 चाचणीसाठी ऑल इंडिया इन्सिट्यूट मेडिकल सायन्सेस, यांच्याकडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना कोरोना चाचणीच्या अहवालासाठी पुण्याला जाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे. कोरोना संसर्गावर … Read more

धक्कादायक! बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडात त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडातील त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 … Read more

कराड उपजिल्हा रुग्णालयातील 6 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५२ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 6 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे … Read more

कराड तालुक्यात ११ वर्षाचा मुलगा कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज तालुक्यातील एका ११ वर्षांच्या मुलाचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा … Read more

कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरुच; आज पुन्हा नवे ५ रुग्ण सापडल्याने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने पुणे मुंबई शहरांसोबत आता ग्रामिण भागातही चांगलेच पाय रोवले आहेत. आज कराड तालुक्यात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण पोझिटिव्ह सापडले असून यामुळे सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. आज मंगळवारी सापडलेले रुग्ण आगाशिवनगर आणि वनवसमाची येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.  ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यात सध्या कोरोनाचे … Read more

कराडात आज पुन्हा २ जण कोरोना पोझिटिव्ह, तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २५ वर पोहोचली आहे. तसेच आज ९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून १३ जणांना अनुमानित म्हणून … Read more

कोरोना कक्षात काम करणार्‍या परिचारिकेचा कराडात मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात काम करणार्‍या एका परिचारिकेचा आज कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाला.मेंदूला ऑक्सीजन कमी पडत असल्याने आज त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले. ज्योती राक्षे (वय 43) असे मृत्यू झालेल्या परिचारिकेचा नाव असून त्यांच्या मृत्यूचा कोरोनाशी संबंध नाही. सदर परिचारिका सातारा जिल्हा रुग्णालयातील … Read more

कराड कोरोनाचे हाॅटस्पाॅट; आज पुन्हा ७ जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुका आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला आहे. सकाळी ५ रुग्णांचे अहवाल पोझिटिव्ह आल्यानंतर आता पुन्हा नवे ७ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. सदर रुग्ण कोरोना बाधित असून त्य‍ांचे अहवाल पोझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक अमोद गडिकर यांनी दिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता … Read more

कराड तालुक्यात एका दिवसात 5 जण कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या २६ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर पाच नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामुळे आता कराडकरांची चिंता वाढली आहे. … Read more

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे आजी मुख्यमंत्री ठाकरेंना खास पत्र! केल्या ‘या’ विशेष सुचना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने लॉकडाऊन ३ में पर्यंत वाढवला आहे. तरीसुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा बघता लॉकडाऊन कधी संपेल किंवा किती वाढविला जायील याबद्दल सर्वच साशंक आहेत. अश्या परिस्थितीत राज्यातील काही महत्वाचे घटक आहेत कि ज्यांचा रोजी रोटीचा प्रश्न आहे. अश्यांना राज्य सरकारतर्फे काही मदत व्हावी तसेच कोरोनाच्या अनुषंगाने … Read more