शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव यांच्यासमोर असणार ‘हे’ मोठं आव्हान

महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे.

संपूर्ण कर्जमाफी सोबत शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपये द्या – राजू शेट्टी

परभणी प्रतिनिधी । राज्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानी नंतर उभे करण्यासाठी संपूर्ण कर्ज माफी आणि हेक्‍टरी लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी परभणी मध्ये केली आहे. परभणी येथे आयोजित मोर्चासाठी शेट्टी गुरुवारी आले असता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही मागणी केली आहे. ‘केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत … Read more

काश्मिरचे राहु दे; वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचारावर बोला!- विश्वजीत कदम

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कश्मिरमधील कलम ३७० चा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. राज्यातील वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, बंद पडलेले उद्योगधंदे या विषयावर एक शब्द उच्चारला जात नाही. केवळ जनतेची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे. जनतेने भाजपचे आता कारस्थान ओळखावे व सांगली पुन्हा कॉंग्रेसच्या विचाराची करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ येथे सभा पार पडली. या सभेत विश्वजीत कदम बोलत होते.

कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी

thumbnail 1530802013781

बंगळुरु : निवडणुकीत घोषित केल्या प्रमाणे कुमारस्वामी सरकारने कर्नाटकामधे शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्जमाफीची कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे कुमारस्वामी सरकार लक्ष देत असून एका नंतर एक धडाकेबाज निर्णय घेऊन सरकारची कुशलता दाखवली जात आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुमारस्वामी … Read more