‘बजेट’ महाराष्ट्राचा२०२०: कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी, आणि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. अवकाळी पावसामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू … Read more

बळीराजाला दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना त्यांना हेलपाटे मारायला लागू नयेत, तसेच कर्जमाफी योजनेत अचूकता यावी, हा टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर करण्यामागील … Read more

कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर होतील- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल असं मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होत. याच अनुषंगाने कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर … Read more

अखेर तो क्षण आलाच! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १५ हजार लाभार्थ्यांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होईल अशी माहिती दिली होती. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची … Read more

मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला असून मार्चमध्ये कर्जमुक्ती होणार- मुख्यमंत्री ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान केलं. दरम्यान, राज्यात निवडणूक पार पडल्या आणि मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झालेल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यन्तचे कर्जमाफी जाहीर केली. दरम्यान, या कर्जमाफीनंतर विरोधाकांकडून टीका झाली. मात्र, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत … Read more

सरसकट कर्जमाफीसाठी चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरात काढला हजारो शेतकऱ्यांसोबत धडक मोर्चा

राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापूरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला.

दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्यांचाही सवलतीसाठी विचार करू- बाळासाहेब पाटील

नवनिर्वाचित सहकार मंत्री आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड उत्तर मतदारसंघाला ३० वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! दोन लाखांवरच्या कर्जधारकांसाठी वेगळी योजना आणू

अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या दोन लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणू’ अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही-राजू शेट्टी

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. तसेच सरकार २१ हजार कोटींची कर्जमाफी करत असल्याचा दावाही खोटा असून कर्जमाफीची यादी जाहीर केल्यास सरकार उघडे पडेल अशी टीकाही माजी खासदार राजु शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूरात बोलत होते.

शेतकरी कर्जमाफी अध्यादेशाची परभणीमध्ये होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे – सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी म्हणून दोन लाख रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अध्यादेशाच्या प्रतींची होळी करत आंदोलन केले. अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने न पाळता शेतकर्‍यांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत, परभणी मध्ये आज … Read more