अंबाबाई मंदिरात कोरोना व्हायरसची दक्षता ; पर्यटक भाविकांसाठी स्टेरेलीयम लिक्विडचा वापर

अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या कोरोनव्हायरसपासून बचावासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

कोल्हापूरात स्ट्रीट लाईटसाठी दलित महासंघाने केलं ‘यमराज’ आंदोलन

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर गांधीनगर मेन रोडवरील वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत स्ट्रीट लाईटच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनस्थळी एक कार्यकर्ता दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडल्याचे भासवतो तर दुसरा कार्यकर्ता यमराजाच्या रूपात म्हशीवरून येतो. या आगळ्यावेगळ्या निदर्शनांमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे व … Read more

गांधीनगर सुधारित पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी-आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 20 गावांसाठीच्या 224 कोटींच्या सुधारित गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत केली.यावेळी योजनेबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला. 15 दिवसांनी याबद्दल पुन्हा बैठक घेण्यात येईल असे मंत्री ना.पाटील यांनी सांगितले. बैठकीत बोलताना … Read more

देवस्थान जमिनीचा शर्तभंग; तावडे फाउंडेशनकडून जागा ताब्यात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने शेती करण्यासाठी दिलेल्या जमिनीवर विनापरवाना इमारत बांधल्याप्रकरणी मोरेवाडी येथील आर. एल. तावडे फाउंडेशनकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गुरुवारी जागा ताब्यात घेतली. एकूण तीन एकर जागेपैकी सात हजार चौरसफूट जागेत इमारत बांधून खंडकरी जमिनीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे देवस्थान समितीला आढळून आले. मंडल अधिकारी स्वरूप … Read more

आरोपीच्या बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याबद्दल फौजदारासह दोन पोलीस कर्मचारी निलंबित

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर ‘मोक्का’तील आरोपीच्या बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याबद्दल सहायक फौजदारासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही कारवाई केली. सहायक फौजदार भारत बारटक्के, कॉन्स्टेबल अनिल बाबासाहेब पाटील, महिला शिपाई वर्षा श्रीकांत बागडी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. श्रीधर अर्जुन शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) असे ‘मोक्का’तील आरोपीचे … Read more

शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प- राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आज सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. शेती, शेतकरी … Read more

विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त कौशल्य विकसित करणे काळाची गरज- डॉ.उल्हास उढाण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर आजच्या जागतिकीकरणाच्या व स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये एकापेक्षा अधिक कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्षण व सामाजिक विषयाचे अभ्यासक डॉ.उल्हास उढाण यांनी केले. कौशल्य व उद्योजकता केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी कौशल्य विकास आणि करियर या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.उढाण यांना निमंत्रित केले … Read more

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये मंजूर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तत्कालिन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या काळात हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. बुधवार दिनांक 4 मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी स्मृति रुग्णालयाचे 30 … Read more

कोल्हापूर मोक्का न्यायालयातून आरोपीने ठोकली धूम..

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मोक्का गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी श्रीधर अर्जून शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) हा आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून पळून गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिंगटे याच्याविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी कोल्हापूरातील राजारामपूरी, जुना राजवाडा, गडहिंग्लज आणि आजरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध विविध गुन्हे दाखल … Read more

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेची पूर्वतयारी पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा ७ एप्रिल रोजी सुरु होत आहे. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी पन्हाळ्याचे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी आढावा बैठक घेतली. यात्रेला सहा ते सात लाख भाविक येतात. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. … Read more