राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच राज्यातील महानगरपालिका निहाय कोरोना रुग्णांची माहिती दिली. राज्यात पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीच्यानुसार पिंपरीचिंचवडमध्ये … Read more

तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्‍याकडून बलात्कार

ठाणे प्रतिनिधी | घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ब्रह्मांड येथील तुर्फेपाडा परिसरात पीडित मुलगी, तिचे वडील, आजी, आत्या आणि आत्याचा नवरा एकत्र राहत होते. गुरुवारी पीडित मुलगी घरात एकटी असताना … Read more

ठाण्यामध्ये १८ काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे बाळासाहेब थोरातांचे आदेश

गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या गळ्यात उप महापौर पदाची माळ गळ्यात पडली. आता यानंतर काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी यांनी थेट ठाणे गाठत पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा बनावट व्हीप काढून तो वृत्तपत्रात जाहीर केल्याने याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत ६० कोटींची कामे मंजूर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज तब्बल ६० कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती स्थायी समितीचे मावळते सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. इतक्या मोठ्या रकमेची कामं एकाच दिवशी आणि एकच सभेत मंजूर झाल्यानं कल्याणकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. डान्सबाहेरच्या बाहेर असलेल्या पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्याने चौघांना जबर मारहाण केल्याचे उघड झाले आहे. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.    

डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे प्रतिनिधी| डोंबिवलीत आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादात बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात भाजपचा पदाधिकारी जबर जखमी झाला. तर या धुमश्चक्रीत नगरसेवकाचा भाऊ थोडक्यात बचावला. योगेश तळेकर असे जखमी पदाधिकाऱ्याच नाव आहे. जखमी तळेकर हे आजदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. तळेकर यांचा दिनेश राणे या बिल्डरबरोबर यापूर्वी 27 लाखांचा व्यवहार झाला होता. बिल्डर … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र … Read more