कोट्यवधी फॉलोअर्स तरीही सोशल मीडिया का सोडत आहेत मोदी; ही दोन कारण असू शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक सोडण्याचा विचार करीत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी लिहिले की, ‘मी या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करीत आहे’. तथापि, पंतप्रधानांनी त्यांच्या निर्णयामागील काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु याबद्दल अनेक तर्क … Read more

सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

फेसबुकच्या मार्केटिंग संचालकपदी अविनाश पंत; भारतीय बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी फेसबुकची नवी रणनीती

भारताच्या अविनाश पंत यांची फेसबुकच्या विपणन (मार्केटिंग) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतात मार्केटिंगवर अधिक भर देण्याचा फेसबुकचा विचार असल्याचं या निर्णयातून स्पष्ट होत आहे. विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व एप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल. पंत यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव असल्याची माहिती फेसबुकने दिली. पंत यांच्याकडे यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

श्रीनिवास पाटलांच्या दिलखुलास जगण्याचं रहस्य..त्यांच्याच लेखणीतून..!!

श्रीनिवास पाटील. सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि साताऱ्याचे विद्यमान खासदार. यांच्या मिशा जितक्या भारदस्त आहेत त्यापेक्षा भारदस्त आहे त्यांचं एकूण राहणीमान आणि राजकीय जीवनातील वावर. ज्या वयात नातवंडांना करियर करताना पहायचं, त्या वयात हा माणूस जिल्ह्याची धुरा समर्थपणे पेलतोय. हे सगळं हा माणूस साध्य करु शकतोय ते अंतप्रेरणेच्या जोरावर आणि मिळालेल्या चांगल्या साथीदारांच्या पाठिंब्यावर. आज हे खास नमूद करण्याचं कारण म्हणजे श्रीनिवास पाटील यांनी स्वतः लिहिलेली फेसबुक पोस्ट. आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन श्रीनिवास पाटील यांनी आपल्या सामाजिक जीवनातील ५० वर्षांच्या सातत्याविषयी खुलासा दिला आहे. लोकनेता बनणं हे सहज शक्य होत नाही हीच धारणा पाटील साहेबांनी लिहिलेला मजकूर वाचून मनात आल्याशिवाय राहत नाही.

औरंगाबादमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या फेसबुक युझरवर गुन्हा दाखल

बंदी असलेल्या चाईल्ड पॉर्नोग्राफी चे व्हिडिओ शहरातील सिडको सातारा आणि छावणी परिसरातून सोशल मीडियावर वायरल करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्हिडिओ लोड करणाऱ्या फेसबुक प्रोफाईल विरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात प्रथमच दिल्लीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने पुढाकार घेत ही कारवाई केली आहे.

म्हणून मी अभाविप सोडली; अभिनेत्रीनं शेअर केला फेसबुकवर अनुभव

‘प्रिय मित्रांनो, एबीव्हीपी, आरएसएस, भाजपा किंवा कोणतेही हिंदू शक्ती प्रेमी.. मी तुमच्यापैकी अनेकांना समजू शकते. मी ही अशा कुटूंबातली आहे, ज्यातील मुलांना संघाच्या शाखेत पाठवण्याची प्रथा आहे.’

बनावट अकाऊंटवरून अश्लील छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करणे तरुणाला पडले महागात

फेसबुक सारख्या प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट तयार करून अश्लील छायाचित्र प्रसिध्द करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. या तरुण आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून कृत्य केलं आहे. या प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने कौशल्यपूर्णरित्या छडा लावत या तरुणाला गजाआड केले आहे. राजेंद्र तेलंगे असे या तरुणाचे नाव असून त्याला २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लोकप्रियतेच्या बाबतीत ‘टिक-टॉक’ अँप ठरले ‘एकच नंबर’ !

विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद … Read more