आता टाटा ग्रुप देणार अ‍ॅमेझॉन, पेटीएम आणि फ्लिपकार्ट यांना टक्कर, बाजारात आणणार ‘हा’ Super App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुपर अ‍ॅप बाजाराच्या लढाईत टाटा समूहानेही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बाजारात आधीच रिलायन्स जिओ, अ‍ॅमेझॉन, पेटीएम आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या आहेत. खरं तर, टाटा समूह एका ओम्निचॅनल डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहे, ज्यामध्ये कंपनी एकाच चॅनेलद्वारे विविध ग्राहकांच्या व्यवसायांची ऑफर देईल. फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्राने टाटा सन्सचे अध्यक्ष एन … Read more

‘या’ कंपनीने सादर केला एक धमाकेदार प्लॅन, 69 रुपयांमध्ये मिळणार मोफत कॉल आणि 7 जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते. आपल्या या नवीन प्लॅन्समध्ये कंपनी युजर्सला नेहमीच जास्तीत जास्त डेटा आणि मोफत कॉलिंगचा फायदा देण्याचा प्रयत्न करत असते. आताही जिओने आपला 69 रुपयांचा स्वस्तातला प्लॅन आ[लय मोबाईल युजर्ससाठी लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ही युजर्सला अनलिमेटेड कॉलिंगसह डेटा देखील मिळत आहे. चला … Read more

लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्‍याच व्हिडिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अ‍ॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्स​क्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही … Read more

Jio ची Facebook सोबत डील! रिलायन्स समुहाची आत्तापर्यंत ‘या’ मोठ्या कंपन्यांत भागीदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकबरोबर एक मोठा करार केला आहे.या करारानुसार फेसबुक रिलायन्स जिओमध्ये १० टक्के हिस्सा ४३,५७४ कोटी रुपयांमध्ये खरेदी करेल.या करारामुळे आरआयएलला आपला कर्जाचा बोजा कमी करण्यास आणि फेसबुकमधील भारताची स्थिती मजबूत करण्यास मदत होईल.फेसबुकच्या गुंतवणूकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन ४.६२ लाख … Read more

जिओचं नवीन टॉप-अप रिचार्ज; केवळ १० रुपयात मिळणार १ जीबी डेटा आणि कॉलिंग

रिलायन्स जिओनं मागील वर्षी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल करत प्लानच्या किंमतीत वाढ केली होती. सोबतच जिओमधून अन्य नेटवर्कवरील अनलिमिटेड कॉलिंग बंद केली. ह्या सुविधा बंद केल्यानंतर आता अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्सची आवश्यकता भासते. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता अशा ग्राहकांना जिओने खास ऑफर दिली आहे.

व्होडाफोन, एअरटेल कडून दोन लोकप्रिय प्लॅन बंद

दूरसंचार क्षेत्रामध्ये रिलायन्स जिओ ने आगमन केल्यानंतर मोठी क्रांती घडली. कमी पैशांमध्ये जास्त डाटा आणि सुविधा देत त्यांनी मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले. त्यामुळे बाकीच्या अग्रगण्य दूरसंचार कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले. त्यांनी देखील जिओप्रमाणे कमी पैश्यांमध्ये जास्त सेवा देत स्पर्धेमध्ये टिकण्याचा प्रयत्न केला.  मात्र त्यांना यामध्ये मोठा तोटा देखील झाल्याचे समोर आले. याचा परिणाम इतका झाला कि काही अग्रगण्य कंपन्यांना इतर कंपन्यांसोबत विलीनीकरण करावे लागले तर काहींना कंपनी बंद करावी लागली. मात्र आता दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या असलेल्या एअरटेल , व्होडाफोन – आयडिया यांनी  आपला तोटा भरून काढण्यासाठी प्रीपेड प्लॅन्स चे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी त्यांनी आज पासून चालू केली आहे.

दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या खिशाला कात्री !

रिलायन्स जिओ ने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर मोठी क्रांती घडवली. याचा फटका इतर कंपन्यादेखील बसला. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपला मोबाइल प्लॅन कमी पैश्यांमध्ये देण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये काही कंपन्यांना मोठा तोटा झाल्याचे देखील पाहण्यात आले. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या आता भाव वाढ करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘जिओ’च्या ग्राहकांसाठी खूशखबर!

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने फ्री टॉकटाइम देण्याचा निर्णय घेतला आहे. या टॉकटाइमची मर्यादा फक्त ३० मिनिटे इतकी असणार आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा यासाठी जिओ कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागण्याचा निर्णय जिओने दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. जिओच्या ग्राहकांनी अन्य दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर व्हाईस कॉल केल्यास ग्राहकांना प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहे. यातून ग्राहकांना थोडा दिलासा मिळावा यासाठी कंपनीने आता हा निर्णय घेतला आहे.

‘जिओ’कडील ‘फ्री कॉलिंग’चे दिवस गेले

आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.