सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार!’ अशोक गेहलोत यांची जहरी टीका

जयपूर । सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखं आहे. अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केली आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान पायलट यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता ते … Read more

सचिन पायलट यांच्या हातात काही नाही, भाजपा सर्व खेळ खेळत आहे- मुख्यमंत्री गहलोत

जयपूर । “सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचीकारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट म्हणाले…

जयपूर । राजस्थानात बंडाचा झेंडा फडकवून अशोक गेहलोत यांचं सरकार अडचणीत आणणारे सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. काही वेळापूर्वीच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या एका वाक्यात सचिन पायलट यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. … Read more

सचिन पायलट यांना पक्षातून काढा! काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मागणी

जयपूर । मागील २ दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय सत्तानाट्य सुरू आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट राज्यात नैतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. मात्र, सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे गेहलोत सरकारच्या स्थिरतेलाच धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, आता जयपूरच्या फेअरमाँट हॉटेलमध्ये काँग्रेस … Read more

राजस्थानमधील राजकीय पेच अजूनही कायम; सचिन पायलट नेतृत्व बदलावर ठाम

जयपूर । राजस्थानमध्ये राजकीय पेच अजूनही कायम आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेवर कायम राहण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे आता पक्ष काय निर्णय घेतो किंवा पायलट यांची कशी समजूत काढतो हे पाहावं लागणार आहे. पायलट यांचे समर्थक … Read more

काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप..!! सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल; भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार?

अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.