उर्मिला मातोंडकरला सोशल मीडियावर केलं जात आहे ट्रोल; काय आहे कारण..

बॉलिवूडकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची तुलना ब्रिटिश सरकारच्या रौलट अ‍ॅक्टशी केली. पुण्याच्या गांधी भवन मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान यावेळी केलेल्या भाषणांत बोलतांना उर्मिला मातोंडकरने एक चूक केली ज्यामुळं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जेव्हा हत्ती शिरतो भारतीय लष्कराच्या छावणीत!

जंगलातील प्राण्यांचे विविध आणि मजेशीर व्हिडिओ कायम सोशल मीडियावर चांगलेच चर्चेमध्ये असतात. यामुळे नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन देखील होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. पश्चिम बंगालमधील हसीमारा येथील लष्करी छावणीच्या कॅन्टीनमध्ये हत्ती शिरल्याची घटना समोर आली आहे. कॅन्टीनमधील डायनिंग हॉलमध्ये हत्ती सोंड हलवत शिरतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती पुढे चालत जाताना वाटेत येणाऱ्या खुर्च्या आणि टेबल सोंडेने उचलून इकडे तिकडे फेकताना दिसत आहे.

वाणीच्या ‘त्या’ टॉप मुळे नेटकरी संतापले… तक्रार दाखल

नुकतीच अभिनेत्री वाणी कपूरने एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वाणीने ‘हरे राम’ वर लिहिलेल्या खोल गळ्याचा टॉप घातलेला दिसत होता. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता मुंबईकरांनी वाणी विरोधात तक्रार दाखल केली आहे. वाणी यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मुंबईकरांनी केला आहे.

शहीदांच्या मुलांना सेहवाग देतोय ‘क्रिकेटचे धडे’

समाजातील अनेक लोकांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची जबाबदारी घेतली आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही आपली जबाबदारी पूर्ण करत, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांना आपल्या शाळेत क्रिकेटचे धडे देतो आहे. सेहवागने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मुलांचे शाळेत खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.

खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य माणसांनी गप्प रहायचं हे कितपत योग्य- अशोक सराफ

नागपूर प्रतिनिधी। राज्यात शहरी तसेच इतर भागातील रस्त्यामधील खड्यांमूळे सामान्य नागरिकांन पासून कलावंतांना सुद्धा त्रास होत आहे. प्रशांत दामले, पुष्कर क्षोत्री या मराठी कलावंतांनी रस्त्यावरील खड्डयांबाबत आपले खडे बोल सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. याच विषयाला धरून लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी वक्त्यव्य केले. अशोक सराफ म्हणतात की, ‘रस्त्यावरील खड्ड्यांबाबत फक्त कलावंतांनी बोलायचं आणि सामान्य … Read more

नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्डक्लास- प्रशांत दामले

ठाणे प्रतिनिधी। ‘कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ अशी शाल झोडीत पोस्ट प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर केली. कारण कल्याणमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळं येथील रस्त्याच्या दुर्दशेबबाबत दामले यांनी ही पोस्ट केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसही उलटले नाहीत. … Read more

अवघ्या नऊ मिनिटात पिला तब्बल ‘४५ कप चहा’

पुणे प्रतिनिधी | पैज शब्दातच आव्हान आहे अनेक जण हा पैजेचा विडा उचलण्यासाठी जीवावर उदार आणि बेभान ही होतात. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मित्रांमध्ये लागलेली अशीच एक अनोखी पैज सध्या सर्वच सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. गप्पा मारताना मित्रांनी लावलेली एक हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी एका युवकाने ९ मिनिटात ४५ चहा पिऊन टाकून एक अजब … Read more