घरी जेवायला बोलवून साडूने केला साडूचा खुन; मृतदेह फेकला मक्याच्या शेतात

औरंगाबाद – जेवणासाठी घरी बोलावून साडूनेच साडूचा घात केल्याची घटना कन्नड तालुक्यातील कुंजखेडा येथे घडली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. एजाज खाँ हारुण खाँ पठाण असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेफुज खाँ महेबुब खाँ पठाण (23) व मयत एजाज खाँ हारुण खाँ पठाण (35) हे … Read more

पॅन अपडेट करण्यासाठी लिंक ओपन केली अन् दिड लाख रुपये झाले गायब

Cyber Froud

औरंगाबाद – एका मोबाईल क्रमांकावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तुमचे एसबीआय बँकेचे योनो ॲप ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पॅन नंबर अपडेट करावा लागेल. त्यासाठी एका लिंक वर जा त्या लिंक वर गेल्यानंतर योनो ॲपचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका असे मेसेज आले, संबंधिताने ते करताच दोन वेळा अकाउंट मधून एक लाख 57 … Read more

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले, तब्बल 19 लाखांचा ऐवज लंपास

gharfodi

औरंगाबाद – उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सिडको एन-4 भागात राहणाऱ्या एका अभियंत्यांचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेला. हे कुटुंब उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा चोरट्यांनी 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुंडलिक नगर पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर 30 तासांनी गुन्हा नोंदवला. पुंडलिक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोप्पाक व्यंकट नरसिंह स्वामी (मुळ रा. विशाखापट्टणम, ह.मु. … Read more

लग्नाला निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात

marriage

औरंगाबाद – लग्नाला मित्राला बोलावले नाही. लग्नाची माहिती मित्राला झाल्यानंतर त्याने लग्न केल्याचे सांगितले का नाही असा जाब विचारला. त्यावर नवरदेवाने तुला कोणी सांगितले असे म्हणताच हातातील खड्याने नवर्देवाची दात पाडल्याची घटना शहरातील वसुंधरा कॉलनी येथे घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद रामजी अंभोरे (32, रा. बजाजनगर, वाळूज … Read more

डॉक्टरशी वाद घालताना रोखल्याने मोडला पाय

marhan

औरंगाबाद – डॉक्टरशी वाद घालत असल्यामुळे मित्राला रोखताच त्याने सहा साथीदारांच्या मदतीने बेसबॉलच्या बॅटने मित्राचेच पाय मोडल्याचा धक्कादायक प्रकार हडको, एन-13 भागातील मैदानात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपींची 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. जटवाडा रोडवरील एका डॉक्टरसोबत … Read more

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीला सोडून नववधू गेली पळून; पोलिसांनी ‘असा’ केला रॅकेटचा पर्दाफाश

Multi Marriage

  औरंगाबाद – नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगी शिंदे असे अटक केलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. काल दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना त्या मुलीला अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी प्रभाकर शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई … Read more

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून 14 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार

Rape

औरंगाबाद – मामाकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे मूळ गावातील मुलाशी प्रेमसंबंध जुळले, प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या. अल्पवधीतच दोघांनी 5 एप्रिल रोजी पलायनही केले, त्यानंतर मुलगी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गावी परतली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याने संबंधित विधीसंघर्ष बालकाविरोधात पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गांगर्डे … Read more

दोन गटात भरदिवसा तुफान राडा; लाठ्या, काठ्यांसह लोखंडी सळई अन् तलवारी उपसल्याने एकच खळबळ

औरंगाबाद | कोकणवाडी भागात दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असताना काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दोन गटात दगडफेक, आणि तलवारी ने भांडण झाल्याची घटना घडली. भर रस्त्यात झालेल्या या भांडनावेळी लाठ्या, काठ्यांसहा लोखंडी सळई अन तलवारी उपासल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे औरंगाबाद शहरात काळ काही वेळ खबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. कोकणवाडी भागात … Read more

पाडव्याच्या दिवशीच पोटच्या मुलाने केली जन्मदात्या बापाची हत्या

औरंगाबाद – गुढीपाडवा सणासाठी बहिणी, भाचे सर्व कुटुंब गावी आले होते. दरम्यान वडिलांनी मित्रांसह दारू पिल्याने राग अनावर झाल्याने पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी घन घालत हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता चिंचोली गावात घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नानासाहेब घुगे (27) असे त्या मारेकरी मुलाचे नाव असून … Read more

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपविले; शरिराचे केले दोन तुकडे

औरंगाबाद – जिल्ह्यातील दहिगाव शिवारात शनिवारी एका व्यक्तीचा दोन तुकडे करून फेकून देण्यात आलेला मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटविण्यासह या खुनाचा उलगडा करण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्या व्यक्तीचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. संदीप बाळा मोकासे (वय 35, रा. शफेपूर, पिशोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more