सरकारी कार्यालये की मद्यालये ? मंत्रालया पाठोपाठ औरंगाबाद मनपा कार्यालयात देखील दारूच्या बाटल्यांचा खच

औरंगाबाद – राज्याचा गाडा जिथून चालवला जातो आणि सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय, तसेच पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची धक्कादायक बातमी ताजी असतानाच, आता औरंगाबाद शहराचा गाडा जिथून चालवला जातो त्या महानगरपालिका कार्यालयातील स्वच्छतागृहात देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये … Read more

थरारक ! सिल्लोड जवळ फिल्मी स्टाईल अपघात; एक ठार

accident

औरंगाबाद – सिल्लोड शहरात मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दाक्षिणात्य फिल्मी स्टाईलने झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये वाहनाने तीन, चार पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ते फेकले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड शहरालगत असलेल्या भराडी फाटा येथून शहरात … Read more

डेल्टा प्लस रुग्णाची अजब कहाणी; चाचणीनंतर एका महिन्याने पॉझिटिव्ह असल्याचा फोन

delta plus

औरंगाबाद : आरोग्य व्यवस्थेच्या गलथानपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिन्यांपूर्वी कोरोना बाधित असलेला रुग्ण डेल्टा प्लस व्हेरीयंटने बाधित असल्याचे जिल्हा आरोग्य विभागास रविवारी माहीत झाले. सदर कोरोना बाधित रुग्णाचा स्वब ३ जुलै रोजी देण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट ८ ऑगस्टला प्राप्त झाला आणि आरोग्य विभागाची एकच धांदल उडाली. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संशयित … Read more

एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचण्यांत वाढ; पॉजिटीव्ह येण्याचे प्रमाण मात्र शून्य

corona test

औरंगाबाद – ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीने मनपा प्रशासनाने कंबर कसली असून, याच अनुषंगाने शहरच्या एन्ट्री पॉइंटवर चाचण्या वाढवल्या आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात 7 हजार 86 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये एकही रुग्ण कोरोना बाधित आढळून आलेला नाही. असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मांडलेला यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात … Read more

गेल्या 14 वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्यच नाही; उच्च न्यायालयाने फटकारले

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर गेल्या 14 वर्षांपासून सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पर्यावरण रक्षणामधे महत्वाची भूमिका बजवणाऱ्या विभागासाठी ही समिती कार्यरत असणे अत्यावश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत या संदर्भात राज्य शासनाने आपले म्हणणे मांडावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस.व्ही. गंगापुरवाला व न्यायाधीश आर.एन. लड्डा यांनी दिले आहेत. याविषयी अधिक माहिती … Read more

हजारोंची लाच घेताना लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी, जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरने तब्बल ९० हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. अनिल विष्णू सावंत असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांत सरकारी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी … Read more

नैराश्यात तरुण मंडप व्यावसायिकाने संपविले जीवन

suisaid

औरंगाबाद – लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने नैराश्यात जात ३४ वर्षीय तरुण मांडव व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आली. हि घटना शहरातील पाडेगाव भागातील सैनिक कॉलनीत घडली असून भाऊलाल हिरालाल वाणी (३४, रा. माजी सैनिक कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, भाऊलाल हा मंडप डेकोरेशन … Read more

औरंगाबाद : शहरात 2 आणि ग्रामीण मध्ये 11 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

  औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 2, तर ग्रामीण भागातील 11 रुग्णांचा समावेश असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 623 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 867 रुग्ण … Read more

औरंगाबादेत आज एकाच केंद्रावर लसीकरण

moderna vaccine

औरंगाबाद – सध्या शहरात कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यात कोविशिल्ड लसीचा वारंवार तुटवडा निर्माण होत आहे. महापालिकेला सोमवारी पाच हजार लसी मिळाल्या होत्या. पण त्या अवघ्या काही तासात संपल्यामुळे मंगळवारी फक्त एका केंद्रावर कोविशिल्ड लस मिळेल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. कोविशिल्ड लसीच्या तुटवड्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम थंडावली आहे. … Read more

कोविड केअर सेंटरबाबत जिल्हा प्रशासन आणि गरवारे कंपनीत सांमजस्य करार

औरंगाबाद – जिल्हा प्रशासन आणि गरवारे कंपनीच्या बाल कोविड केअर सेंटरबाबत सांमजस्य करार झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि गरवारे कंपनीचे संचालक एस.व्ही.आमलेकर यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील गरवारे कंपनीमध्ये बालकांसाठी कोविड केअर … Read more