केंद्रानं देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं ताब्यात घ्यावं- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । केंद्र सरकारनं देशातील सर्व देवस्थान ट्रस्टकडे पडून असलेलं सोनं कर्जरूपानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील अर्थकारण ठप्प पडलं असून त्याला चालना देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाचा उपाय केंद्र सरकारला सुचवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत … Read more

इन्कम टॅक्स रिटर्न्स ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली । आयकरदात्यांना मोठा दिलासा देणारी एक घोषणा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत अधिक माहिती देण्यासाठी आज सीतारामन … Read more

निर्मला सीतारामन यांनी उद्योगांसाठी सांगितलेल्या सहा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या??

टीम हॅलो महाराष्ट्र | निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठीच्या उद्योगविषयक धोरणांकडे लक्ष देत सहा महत्वाच्या गोष्टींविषयी आज भाष्य केलं. १) मध्यम-सूक्ष्म आणि लघु, कुटीर आणि गृहउद्योगांना सध्या पैशांची कमतरता जाणवत असून या उद्योगाद्वारे देशातील १२ करोड लोकांना रोजगार मिळतो. या सर्व उद्योगांना ३ लाख कोटींचं विनातारणी कर्ज देण्याचं अर्थमंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं. २) सरकारतर्फे २० हजार … Read more

मोदी सरकार लघुउद्योगांसाठी ६ महत्त्वाची पावले उचलणार – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. भारताच्या विकास आणि वृद्धीसाठी आवश्यक असणारं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. १.७९ लाखांचं प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज कोरोना संकट चालू झाल्यानंतर लगेच देण्यात आलं असं सांगतानाच पंतप्रधान … Read more

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं आहे, पण..’- पृथ्वीराज चव्हाण

सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तब्बल २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज मला पुरेसं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच २० लाख कोटी हे रोखीने खर्च … Read more

… म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सॉरी’

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून पॅकेजसंदर्भात माहिती देताना … Read more

मोदींनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर मनसेनं केला ‘हा’ परखड सवाल

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मनसेनं आर्थिक पॅकेजवरून भाजपला टोला हाणला आहे. मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची … Read more

तर लाईव्ह भाषण करून जनतेला गोंधळात टाकताच कशाला?; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

मुंबई । काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियानाची घोषणा केली असून २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज … Read more