बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

Eknath Shinde Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला विठुरायाची महापूजा करण्याचा मान मिळाला. यावेळी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे आणि सर्वाचं भलं होउदे असं साकडं एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला घातलं. … Read more

मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 28 मोठे निर्णय; शिंदे- फडणवीसांकडून कामांचा धडाका

shinde fadnavis cabinet decisions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे- फडणवीस सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत तब्बल २८ निर्णय घेत शिंदे फडणवीस सरकारने कामाचा धडाका लावला आहे. या बैठकीत वर्सोवा- वांद्रे सागरी … Read more

पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई अन् मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, अरे बाबा स्वागत करा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदा उशिरा का होईना पण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. काल दिवसभरात राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे दिसलं. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची तर पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. संपूर्ण मुंबईची तुंबई झाली असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता अरे बाबांनो, पावसाचं स्वागत करा … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! आता 5 वी- 8 वी ला वार्षिक परीक्षा होणार; विद्यार्थी नापास झाल्यास पुढे काय?

exam for 5th and 8th standard students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना नापास केलं जातं नव्हतं. विद्यार्थी कसाही असला तरी त्याला ढकलगाडी करत पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात यायचा.मात्र सरकारने यामध्ये बदल केला आहे. त्यानुसार, इथून पुढे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क … Read more

Ashadhi Ekadashi 2023 : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! सरकारकडून विमा योजनेची घोषणा

Ashadhi Ekadashi 2023 vima yojana decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2023) राज्यभरातून लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी पंढरपूरला निघाले आहेत. टाळ- मृदूंगाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. याच दरम्यान, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकार तर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी … Read more

…. तेव्हा शिंदे स्वतःला गोळी मारून घेणार होते; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या 50 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही मिळवलं. परंतु जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं असत तर त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:लाच संपवलं असतं, असा … Read more

20 जून ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून जाहीर करा; संजय राऊतांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या सहित ४० आमदारांच्या बंडाला आज २० जून रोजी १ वर्ष पूर्ण झालं. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत आणि मग गुवाहाटीला गेले. आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आल. आज या घटनेला १ वर्ष पूर्ण झालं असून या … Read more

गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर; सामनातून एकनाथ शिंदेंवर घणाघात

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापनदिन आहे. गेल्या वर्षभरात शिवसेनेत जे काही वादळ आलं, ज्या घडामोडी घडल्या, आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं या सर्व घडामोडींवरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. यावेळी गद्दार, लांडगे, खोकेबहाद्दर, नकली अशा शब्दात सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा … Read more

रेशन आपल्या दारी!! शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता घरपोच रेशन मिळणार

ration aaplya dari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील गरीब आणि गरजू जनतेसाठी मोठी खुशखबर आहे. शासन आपल्या दारी या अभियानानंतर आता रेशन आपल्या दारी हा उपक्रम राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कडून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांअंतर्गत तुम्हाला रेशन आणण्यासाठी रेशनच्या दुकानात जावं लागणार नाही तर सरकारच घरपोच धान्याचे वाटप करणार आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का!! मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

manisha kayande leave thackeray group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) या उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे यांच्यासोबत ३ माजी नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अश्या बातम्या वेगाने पसरत आहेत . उद्या शिवसेनेचा ५७ … Read more