गॅस रेग्युलेटर फुटल्याने आगीचा भडका घरातील ७५ हजारांचे नुकसान

बुलढाणा प्रतिनिधी | मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील प्रवीण नारायण सराफ यांच्या घरी स्वयंपाक करताना अचानक गॅस रेग्युलेटर फुटल्याने गॅसचा भडका होऊन घरातील 75 हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. जानेफळ येथील प्रवीण सराफ यांच्या पत्नीला ‘उज्वला योजना’ अंतर्गत ‘एच पी गॅस’ मिळाला होता.आज सकाळी त्या स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचे रेग्युलेटर फुटले व गॅसने पेट घेतला. … Read more

सांगलीमध्ये गोदाम आणि घराला आग

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहर परिसरातील शामरावनगर येथील साई कॉलनीतील भंगार गोदामाला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र स्वरुप धारण केल्याने यामध्ये प्लास्टिक, वायरींसह विविध भंगार साहित्य जळून खाक झाले. गोदामापासून जवळच असलेल्या बिरदेव रघुनाथ पालखे यांच्या घरालाही आगीचा फटका बसला. त्यात त्यांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. … Read more

आल्लापल्ली जवळ तेंदुपत्त्याने भरलेला ट्रक जळून खाक

गडचिरोली प्रतिनिधी । तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदू पत्त्यासह ट्रक पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना आज दहा जून रोजी अल्लापल्ली – आष्टी मार्गावर आलापल्लीजवळ घडली. ट्रकमध्ये जवळपास 30 लाखांचा तेंदूपत्ता होता अशी माहिती आहे. सध्या जिल्ह्यातून तेंदूपत्त्यची वाहतूक केली जात आहे.आज अशाच एका ट्रकने वेलगुर येथून तेंदूपत्ता घेऊन जात असताना विज तारांचा … Read more

धक्कादायक! सावकाराने ‘या’ कारणामुळे महिलेसह तिच्या मुलाला जिवंतपणी जाळले

चंद्रपूर प्रतिनिधी | एका सावकाराने व्याजाने दिलेल्या रकमेसाठी महिलेसह तिच्या मुलावर पेट्रोल टाकून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडलाय. यामध्ये आई आणि मुलगा दोघेही भाजले असून त्यांना कोलसिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. सदर घटना सरकारनगर येथील असून मंगळवारी दुपारी 1:00 च्या सुमारास घडली. सरकारनगर येथील रघुनाथ हरणखेडे यांच्यावर असलेल्या कर्जाची रक्कम मागण्यासाठी सावकार … Read more

अहमदनगर जिल्‍हयातील ‘सैराट’ प्रकरणी महिला आयोगाचे पोलीस अधीक्षकांना ‘हे’ पत्र

अहमदनगर प्रतिनिधी | जिल्‍हयातील ‘सैराट’ प्रकरणाची राज्‍य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.मुलगी-जावयाला पेटविल्‍या प्रकरणात आपण व्यक्‍तीशः लक्ष घालून उचित कार्यवाही करावी असे पत्र महिला आयोगाने अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. तसेच कार्यवाहीचा अहवाल देखील महिला आयोगाने मागविला आहे. अहमदनगर जिल्‍हयातील पारनेर तालुक्‍यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्‍याने नाराज झालेल्‍या मुलीच्या घरच्यांनी मुलीला आणि जावयाला … Read more

आंतरजातीय विवाह केल्याने पोटच्या मुलीला जिवंत जाळून मारलं

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलगी व जावई या पती पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देउन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली आहे. पती पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मंगेश रणसिंग गंभीर जखमी तर रुख्मिणी रणसिंग हिचा पुणें येथे ससून हॉस्पिटल मध्ये … Read more

पाथरीत रेणुका शुगर परिसरात आग

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी जिल्ह्याचा पारा 45 पार होऊन तापमान कमालीचे वाढले असताना जिल्ह्यामध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेले आहे .पाथरी शहराच्या शेजारील रेणुका शुगर कारखान्याच्या परिसराला वीज वितरण ची तार तुटून पडल्याने आग लागण्याची घटना शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी घडली असून सुदैवाने यामध्ये कुठलेही नुकसान झाले नाही. 26 एप्रिल रोजी पाथरी … Read more

मनमाड येथील फ्लोअर मिलने घेतले रौद्ररुप, आगीत धान्याच्या गोन्या घाक

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख मनमाड-नांदगाव महामार्गावरील बुरकुलवाडी परिसरातील एका फ्लोवर मिलला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत मिल पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. नांदगाव महामार्गावर बुरकुलवाडी परिसरात औद्योगिक वसाहत असून त्यात अजित बेदमुथा यांची फ्लोवर मिल … Read more

वायरींगच्या स्पार्किग ने आग लागून ऊसासह ट्रॅक्टर जळून खाक

unnamed file

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे ऊस भरलेल्या ट्रॅक्टर च्या हेड मधील वायरींगमध्ये अचानक बिघाड झाल्याने स्पार्किग होऊन लागलेल्या आगीत टूॅक्टर सह ऊसाने भरलेली ट्रॉली जळून खाक झाल्याची घटना बुधवार १३ फेबुवारी रोजी तालूक्यातील गलबे देवेगाव येथे सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास घडली. यात शेतकऱ्याच्या ऊसासह ट्रॅक्टरचे ६ लाख २० हजाराचे नुकसान झाले असुन सदरील घटनेचा पंचनामा … Read more