बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – पालकमंत्री सुभाष देसाई

desai

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली. गंगापूर तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून देसाई यांनी शेतकऱ्यांना … Read more

सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री सुभाष देसाई

Sunil

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे नुकसान, जिवितहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री … Read more

शहरातील विकासकामांसाठी 782 कोटी द्या; आयुक्तांची शासनाकडे मागणी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात विविध विकास कामांचे 21 प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले असून, सध्या 90 टक्के कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र, गरवारे स्टेडियमचा विकास, सातारा देवळाई आणि गुंठेवारी भागात ड्रेनेज लाईन या पाच मोठ्या विकासकामांसाठी 782 कोटी रुपयांची गरज आहे. या संदर्भात शासनाकडे आपण निधीची … Read more

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करा – पालकमंत्री सुभाष देसाई  

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-अहमदनगर प्रस्तावित रेल्वे मार्ग, विभागीय क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येत असलेला ‘सिंथेटीक ट्रॅक’, संत एकनाथ महाराज संतपीठ, संत ज्ञानेश्वर उद्यान, सफारी पार्क,झकास पठार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘उभारी’ प्रकल्प असे अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणारे आहेत. असे महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. … Read more

पालकमंत्र्यांनी चक्क दहावेळा केले औरंगाबादचे नामांतर

subhash desai

औरंगाबाद – जिल्ह्याचे पालक मंत्री था राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मागील दौर्‍यात औरंगाबादचे नामांतर करण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच त्यांनी केलेल्या या घोषणेचे पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले. पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत … Read more

महालसीकरण अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद |  कोविड आजाराला अटकाव करण्यासाठी आवश्यक लस सिल्लोड, सोयगाव तालुक्यात 02, 03 सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानात देण्यात येणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून आणि बजाज उद्योग … Read more

मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेला ऑक्सीजन प्लांट दोन आठवड्यातच बंद

meltron oxigen plant

औरंगाबाद |  15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन प्लांट चे लोकार्पण करण्यात आले होते. परंतु दुर्दैवाने दोन आठवड्यातच हा प्लांट बंद पडला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्लांट औरंगाबाद शहरासाठी दिला होता. मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आणि महापालिकेच्या मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन … Read more

स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे दाखवणे आले अंगलट; खासदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

kale zende

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘माझे विद्यापीठ परत द्या’ या मागणीसाठी दिल्ली गेट येथे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी खासदारांसह 24 पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादला होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी … Read more

शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ! खासदार आणि पालकमंत्री आमने-सामने

jalil-desai

औरंगाबाद | गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद आहेत. काल स्वातंत्र्य दिनी पुन्हा एकदा औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ असल्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. तर दुसरीकडे तुमच्यात हिंमत असेल तर नाव‌ बदलून दाखवा असे खुले आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला … Read more

क्रांतीचौकातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा जानेवारीत बसवणार

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिसेंबर २०२१ किंवा जानेवारी २०२२ पर्यंत बनविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. क्रांती चौक येथील जुना पुतळा दोन वर्षांपूर्वी महापालिकेने काढला होता, त्यानंतर महापालिकेने चबुतरा बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु बांधकामसाठी निधी वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटीदराकडून काही काळ … Read more