खून प्रकरणातील संशयिताने नशेमध्ये रुग्णालयात घातला धिंगाणा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे खंडणी, चोरीसारखे गुन्हे नावावर असलेल्या नवनाथ ज्ञानू लवटे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. योगेश दिलीप शिंदे असे संशयिताचे नाव असून घटनेवेळी तो पूर्णपणे नशेत होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास रूग्णालयात दाखल केले असलेतरी तो नशेतच असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे या खूनाचे नेमके कारण … Read more

द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकी प्रकरणी सहा परप्रांतीय दलालांवर गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातल्या चिंचणी येथील 18 द्राक्ष बागायतदारांची द्राक्षे उधारीवर खरेदी करून त्याची 31 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा दलालांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनीष गुप्ता, हरिशचंद्र वर्मा, शेख बागवान, शेखर मोहन, चिराग अविनाश पाटील व राजकुमार रामगोपाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या दलालांची नावे आहेत. तर फसवणूक झालेल्यात अंकुश … Read more

विटा पोलिसांनी लावला चोरट्यांच्या धूम टोळीचा छडा, 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत खानापूर तालुक्यातील चिखलहोळ, रेणावी आणि वाळूज येथील तीन घरफोड्या उघडकीस आणून आंतरराज्य अट्टल चोरट्यांच्या धूम टोळीचा छडा लावला. या टोळीतील एका अट्टल चोरट्यास गजाआड केले असून योगेश रमेश नानावत असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. तर त्याचे अन्य तीन साथीदार फरार आहेत. उघडकीस आणलेल्या घरफोड्यांमधून … Read more

चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पर्दाफाश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर शहरातील चारचाकी कार चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे. चोरी प्रकरणातील राजू बाबूराव जावळकर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बोलेरो व चारचाकी कार हस्तगत करण्यात आली. चोरटयाचे दोघे साथीदार फरार झाले आहेत. 31 जानेवारी रोजी इस्लामपूर-आष्टा नाका परिसरातील भास्कर मोरे यांच्या माणेकश्वर मोटर गॅरेजमध्ये … Read more

मोबाईल चोरीच्या संशयावरून परप्रांतीयांच्या दोन गटात फिल्मीस्टाईल राडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मोबाईल चोरीच्या संशयाने वाघवाडी फाटा परिसरातील परराज्यातून आलेल्या आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांनी पाठलाग करत उत्तरप्रदेशच्या एका तरूणाला पकडले. कोल्हापूर रस्त्यावर सकाळी 8 च्या दरम्यान दोन्ही परप्रांतियांच्यात मोबाईल चोरीवरून चांगलाच राडा झाला. छोटी मुले, महिला साहित्य डोक्यावर घेवून शास्त्रीनगरमधील एका गल्लीत अचानक आरडाओरडा करत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. आयुर्वेदीक औषध विक्रेत्याच्या कुटुंबियांनी … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलेढोणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. कलेढोणे याच्याकडून घरफोडीतील ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलेढोणे … Read more

भरधाव वेगाने निघालेल्या कारमध्ये सापडले लाखो रुपयांचे घबाड, पोलिसांकडून चौघांना अटक

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या १०० फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंप समोर भरधाव वेगात निघालेल्या इंनोव्हा गाडीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची बेकायदेशीर रक्कम आढळली. त्रिमूर्ती चौक येथे नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांनी सदरची गाडी पकडली असता मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले. या गाडीमध्ये एकूण ६३ लाख ५० हजार रुपये सापडले. या प्रकरणी कोल्हापुरातील … Read more

चालकानेच मारला मालकाच्या लाखो रुपयांवर डल्ला, ड्रायव्हरसह दोन मित्रांना शहर पोलिसांकडून अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या वखारभाग मध्ये भेळ खाण्यासाठी मालक गाडीतून उताराला असता सदरच्या गाडीतून काच फोडून दहा लाख रुपये रक्कम अज्ञातांनी लुटल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित गाडीच्या चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. डोक्यावर कर्ज असल्याने चालकानेच मालकाच्या 3 लाख 14 … Read more

‘पुष्पा’ अखेर मिरजेत जेरबंद ! तब्बल अडीच कोटीचे लाल चंदन जप्त

सांगली  | सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती आज सांगली जिल्ह्यात आली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या चंदनाच्या तस्करीचे रॅकेट मिरज गांधी पोलिसांनी उधळून लावले. यावेळी पोलिसांनी तब्बल अडीच कोट रुपये किमतीचे एक टन रक्त … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड, 5 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली, मिरजेसह कुपवाड एमआयडीसी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. तिघांच्या टोळीकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. श्रीशैल राम राजमाने, अनिस अल्ताफ सौदागर आणि अक्षय लक्ष्मण कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे … Read more