प्रेमवीर पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

साताऱ्यात प्रेम प्रकरणात अडककेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल

गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. एका शाळेत शिकविणारीच वर्गशिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची तक्रार पालकांनी पोलिसांत दाखल केली आहे.

पतंगाच्या नायलॉन मांज्यामुळे अनेक नागरिक जखमी; विक्रेत्यांवर पोलिसांची थातुरमातुर कारवाई

नुकताच संक्रांत हा सण साजरा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले गेले. मात्र नायलॉन व मांजा वापरण्यास बंधी असतांना पतंगबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मांजा दोऱ्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरीक जखमी झाले आहेत. जिवघेण्या नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याची शहरात बड्या व्यापाऱ्यांनकडून विक्री होत आहे. मात्र पोलिस छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष करून थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

भंडारकवठे खून प्रकरण; आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलांनी काढला काटा

दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कु-हाड आणि विळयाने गळा कापून आपल्या वडिलांचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पत्नी आणि दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यात्रेत हरवलेल्या बालकाला पोलीसांनी शोधलं; माय-लेकराची करून दिली भेट

अमरावती जिल्हातील बहीरम येथे दरवर्षी भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रभर नावलौकीक असणार्‍या बहीरम यात्रेवर येथिल पोलीसांची बारीक नजर असून मंगळवारी येथे एका हरवलेल्या बालकाला पोलीसांनी शिताफीने शोधून त्याच्या आईवडलांच्या स्वाधिन केले. यात्रेमधे येणार्‍या यात्रेकरूंनी स्वतःच्या मुलांकडे नेहमी लक्ष ठेवण्याची विनंतीही यावेळी पोलीस प्रशासनाने केली. खरेदी करण्यात मग्न असलेल्या पालकांकडून लहान बालकांकडे दुर्लक्ष केले जाते आणि याचा परिणाम म्हणून मुले हरवतात. मुलं हरवणार नाहीत याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी असा सल्ला पोलीसांनी यावेळी दिला आहे.

औरंगाबाद विद्यापीठ आवारात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांना पोलिसांचा चाप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शहरातील दोन वेगवगळ्या महाविद्यालयातील युवकांना सार्वजनीक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दोन युवकांना आज बेगमपुर पोलिसांनी अटक केली. यात टीकटॉक प्रेमींची दर दिवशी नव्याने भर पडत आहे. यामुळे विद्यापीठात येणा-या प्रत्येकाला याचा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे विद्यापीठ प्रशासन डोळे झाक करत असल्याच पहायला मिळत आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनावेळी पोलीस प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये खडाजंगी

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली. या निषेध रॅली दरम्यान काही ठिकाणी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. विद्यार्थी उद्धट असल्याचा शेरा पोलिसांनी मारला तर विद्यार्थ्यांकडून संघ आणि भाजपच्या लोकांना टार्गेट करण्यात आलं.

#CAA ,बुलंदशहरमधील मुस्लिमांनी पोलिसांना 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सोपविला

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालॆल्या आंदोलनाला हिंसात्मक वळण मिळाले आणि यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. योगी सरकार आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करत आहे. याच दरम्यान, बुलंदशहरमध्ये मुस्लिम समाजातील लोकांनी 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची भरपाई करण्यासाठी 6.27 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जिल्हा प्रशासनाकडे सोपविला आहे. “Our ability to reach unity in … Read more

बँकमधील सायरन वाजू लागल्याने मध्यरात्री खळबळ; पोलीस,नगरसेवकांची पळापळ

बँकमधील एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी एटीएम सेंटर मध्ये सायरन लावल्याचे सर्वत्र पाहण्यात येत. मात्र अशा एका सायरनमुळे रात्री सर्वांना कश्या पद्धतीने मनस्ताप होऊ शकतो याचा प्रत्यय सिडको एमआयडीसी च्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आला. एन-१ परिसरातील सिंडीकेट बँकेचा सायरन शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास अचानक वाजण्याचा सुरू झाला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. सायरनचा आवाज आल्याने स्थानिक नगरसेवक मनोज गांगवे, विशाल गंगावणे, गणेश गांगवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे कोणीच नसल्याचे आढळून आले.

बेपत्ता पत्नीच्या शोधात पती हैराण; पोलिसांना काही पत्ता लागेना

शहरातील एका खासगी सुरक्षा रक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांना अजूनही त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी तपासाबाबत काय पावले उचलली आहेत. अशी विचारणा करत १३ डिसेंबरपर्यंत अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते.