‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेने डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे यांच्यातील आरोप – प्रत्यारोप सुरूच असताना आता मनसेने शिवसेना भवनासमोर दसऱ्याच्या शुभेच्छा देताना गर्व से कहो हम हिंदू है अशी बॅनरबाजी करत शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता शिवसेने कडून नेमकं काय प्रत्युत्तर येणार हे सुद्धा पाहिले पाहिजे. सेनाभवना समोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे … Read more

गुलाबरावांच्या डोक्यातच दुष्काळ, संवेदनाहीन गुलाबना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? मनसेची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच नुकसान झाले असून शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांची मदत करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना फटकारले होते. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काय मोठं काम केलं नाही अस गुलाबराव पाटील यांनी म्हणल्यानंतर आता मनसेने पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देत कडक … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी 50 हजारांची मदत करा; राज ठाकरेंची मागणी

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी … Read more

अखेर मनसे- भाजप युती!! ‘या’ जिल्ह्यात एकत्र लढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सुरू असतानाच अखेर भाजप-मनसेच्या युतीचा नारळ फुटला असून पालघर येथे भाजप आणि मनसे एकत्र पोटनिवडणुक लढणार आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली … Read more

भाजपसोबत युती करा, पक्षाला फायदा होईल; मनसे नेत्यांची मागणी

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपशी युती करावी अशी मागणी मनसेच्या पुण्यातील नेत्यांनी राज ठाकरेकडे केली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल, असे सांगितले जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु … Read more

आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा बरं चाललंय सरकारचं; राज ठाकरेंची टीका

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. मला वाटतंय की, या सगळ्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बरं चाललंय. कारण, कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरायचं नाही. आपले आपले पैसे कमवा, … Read more

कोरोना काय फक्त सणांमध्ये पसरतो का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना, लॉकडाउन आणि दहीहंडी सणासाठी घातलेले निर्बंध यावरून राज्यातील ठाकरे सरकार वर सडकून टीका केली आहे. कोणतीही गोष्ट होऊ नये म्हणून पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा … Read more

2024 ला आमचं एकच इंजिन असणार; फडणवीसांचे सूचक विधान ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे भाजप युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलं पुणे येथ मेट्रोच्या कामाच्या पाहणीनंतर देवेंद फडणवीस यांनी … Read more

मनसे- भाजप युती होणार का? फडणवीसांनी सांगितली नेमकी अडचण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या शक्यतेबद्दल चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यामुळे मनसे- भाजप युतीची शक्यता वाढली आहे. परंतु अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी … Read more

मनसेसोबत युतीसाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल- चंद्रकांत पाटील

raj thackarey chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी मनसे- भाजप युतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता मनसेसोबतच्या युतीसाठी केंद्राची परवानगी लागेल अस मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं … Read more