निवडणूक लांबल्याने ‘या’ मिनी मंत्रालयावर येणार प्रशासक राज

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत अपेक्षित होता. मात्र ओबीसी आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षण सोडत जाहीर झालेली नसल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट दिसते. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मागणीवर राज्य सरकार आग्रही आहे, परंतु निवडणूक विभागाने अद्याप प्रशासनाची भूमिका गुलदस्त्यांत ठेवली आहे. निवडणूक … Read more

धामणी-बामणीत गव्याचा मुक्त संचार; परिसरात खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील धामणी, बामणी परिसरात बलाढ्य गवा आज दाखल झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास बामणीतील माळभाग परिसरात ऊस तोडणी मजुरांना हा गवा दिसून आला. त्यानंतर तत्काळ वनविभागाचे पथक घटनास्थळी धावले. पायांच्या ठशांवरून तो गवा असल्याचे समोर आले असून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शहरातील मार्केट यार्ड … Read more

जि. प. माजी सभापतींकडून अधिकार्‍यास शिविगाळ, अदखलपात्र गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर सोमवारी झालेल्या राड्यानंतर आता मंगळवारी पुन्हा माजी पदाधिकारी आणि अधिकार्‍यामध्ये राडा झाला. माजी सभापती तमनगौडा रवि-पाटील यांनी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबतचा विश्रामबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून मुख्याल्यासमोर … Read more

गेल्या दोन वर्षांपासून अखंडपणे ‘या’ गावात सकाळी वाजते राष्ट्रगीत, ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत वाजताच सर्वजण होतात स्तब्ध…

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी असेच काहीसे केले आहे, ज्यानंतर भिलवडी हे गाव देशातील सहावे गाव आणि महाराष्ट्रातील पहिले नियमित राष्ट्रगीत वाजविणारे गाव बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या … Read more

‘या’ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात दोन गटात तुफान राडा, साहित्याची केली तोडफोड

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जिल्हा परिषद सदस्यांना समान निधी वाटप आणि सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून धुसफूसत असतानाच वॉटर एटीएमच्या पाच कोटींच्या टेंडर वरून सांगली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात दोन गटात तुफान राडा झाला. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. बंगल्या मधील साहित्याची तोडफोड करण्यात आली. राड्या दरम्यान जिल्हा … Read more

प्रजासत्ताकदिनी राजपथ संचलनाचे नेतृत्व वाळव्याच्या कन्येकडे, तटरक्षक दलाचे नेतृत्व करण्याची मिळाली संधी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या संचालनाचे नेतृत्व करण्याची संधी सांगली जिल्ह्यातील वाळव्याच्या कन्येला मिळाली आहे. अपूर्वा गौतम होरे यांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या तटरक्षक दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तीन वर्षांपासून अपूर्वा होरे या भारतीय नावीक दलात गुजराथ (पोरबंदर) येथे असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहेत. बी.ई. इलेक्ट्रॉनिक असलेल्या … Read more

‘या’ जिल्ह्यात 101 एस.टी. कर्मचारी करण्यात आले बडतर्फ, आणखी 500 कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीवर सुनावणी सुरू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस.टी. संपातील कर्मचाऱ्यांवर आता सांगलीत बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी २०१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत १ हजार ६०० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. एस.टी. महामंडळाचे कर्मचाऱ्यांसह शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा … Read more

रस्त्याच्या उद्घाटनासाठी नगरसेवकांमध्ये खडाजंगी, तीन तासांच्या नाट्यमय घडामोडी नंतर आमदारांनी फोडला नारळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या उद्घाटन कामाच्या श्रेय वादावरून राष्ट्रवादी भाजप नगरसेवक यांच्यात सुमारे दोन तास चांगलीच खडाजंगी झाली. या रस्त्याच्या उद्घाटनाचे भाजपने चार वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्याचे ठरवले .तर त्या आधीच राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने ,शेठजी मोहिते,पदाधिकर्यांच्या समवेत विरोधीपक्ष नेते … Read more

मांज्यामध्ये अडकलेल्या पारवळाची अर्धा तासाच्या रेस्क्यूनंतर अग्निशमनकडून सुटका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मांज्यामध्ये अडकलेल्या एका पारवळाची मनपा अग्निशमन विभाग, वीज मंडळ आणि प्राणी मित्रांकडून सुटका करण्यात आली. अर्धा तास रेस्क्यू करीत या सर्वानी या पारवळास जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. महापालिकेच्या मंगलधाम इमारतीसमोरील एका झाडावरील मांज्यामध्ये एक पारवळ अडकल्याची माहिती नागरिकांनी महापालिका अग्निशमन विभागाला दिली. यावेळी अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि त्यांची … Read more

‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येसह मृत्यू संखेतही झाली वाढ, कोरोनाचे नवे 870 रुग्ण तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होत असताना सहाव्या दिवशीही रुग्णवाढ कायम राहिली. जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 290 रुग्णांचा समावेश आहे. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा पार केला. बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी … Read more