‘या’ तालुक्यात अनधिकृतपणे कोळसा भट्टीना आला ऊत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील बिरनाळ, कंठी, वळसंग, काराजंगी, निगडी इत्यादी परिसरात अनधिकृतपणे कोळसा भट्टीना ऊत आला आहे. वनखाते खात्याच्या आशीर्वादाने या कोळसा भट्ट्या सुरू असल्याची चर्चा आहे दर ५० किलोच्या पोत्यास ३०० रुपये दराने कोकणातील मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. वनखात्याच्या आशीर्वाद जोरात असल्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेला या कोळसा भट्ट्या सुरू आहेत जत … Read more

‘त्या’ चारचाकी गाडीची सम्राट महाडिक यांच्याकडून पाहणी, महाडिक उद्योग समूहाकडून कुमार पाटील यांचा सन्मान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत शेतकर्‍यांसाठी उपयुक्त चारचाकी गाडीची निर्मिती करणार्‍या कुमार पाटील यांची भेट घेत युवा नेते सम्राट महाडिक यांनी कौतुक केले. सम्राट महाडिक यांनी कुमार पाटील यांच्या वर्कशॉपला प्रत्यक्ष भेट दिली आणि चारचाकी गाडीची पाहणी केली. इस्लामपूर पेठ रस्त्यावरील विष्णू नगर येथील फेब्रिकेशन व्यवसायिक कुमार पाटील यांनी एक वर्षाची मेहनत … Read more

विरोधकांनी माझा बाप काढला, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांना घायाळ करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी आपल्या विजयानंतर विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला.आजच्या या विजयानंतर त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पाटील यांनी म्हंटल. रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. त्यानंतर रोहित पाटील यांनी प्रचाराची सर्व … Read more

रोहितने विरोधकांना आर आर पाटीलांची आठवण करुन दिलीच; कवठे महांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विजयी

rohit patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी सर्व विरोधकांना अस्मान दाखवत आपली सत्ता खेचून आणली आहे. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा जिंकत आपलं नाणे खणखणीत आहे हे दाखवून दिले आहे. कवठे महांकाळ येथे 13 जागांसाठी नगरपंचायत निवडणूक लागली होती. यामध्ये … Read more

घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी 5 लाख 36 हजारांचा मुद्देमाल केला जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पुणे, विटा आणि कडेगाव तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. लोकेश रावसाहेब सुतार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३६ हजार ७६० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. माधवनगर येथे घरफोडीतील दागिने विक्रीसाठी सुतार … Read more

पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृष्णा नदीच्या पात्रात दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे काही दिवसापासून नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांना मुंगुसासारखा प्राणी वावरताना दिसत होता. शेतकऱ्यांनी याची माहिती नदीकाठी वावरणाऱ्या मगरीच्या बंदोबस्तासाठी डिग्रज बंधाऱ्या वरील वन कर्मचारी इकबाल पठाण व ढवळे यांना दिली होती. त्यांनी माग घेता मुंगसासारखा वेगळाच प्राणी नदीच्या काठावर फिरत असलेला दिसला. खात्री करणेसाठी जवळ जाऊन शोध घेतला असता मुंगूस नसून मुंगसासारखा … Read more

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास घातली बंदी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आता सांगली जिल्हापरिषदेत नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर नागरिकांनी इमेल अथवा टपालाद्वारे कामे सांगितली तर त्याची लवकरात लवकर। सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. … Read more

राज्यातल्या तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात, निर्बंधांमुळे आली उपासमारीची वेळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे, निर्बंध शिथील झाल्यानंतर तमाशा फड सज्ज झाले, मात्र पुन्हा निर्बंध लागू झाल्याने, आता या तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या पन्नास दशकांपासून तमाशा क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या सांगलीच्या कवलापूरचा काळू-बाळू तमाशा फड सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वेळेची मदत अथवा तामशा कलावंतांच्या समोर आत्महत्या … Read more

कौतुकास्पद ! भंगारातील एमएटी अन रिक्षाचे साहित्य वापरून बनविली 1930 सालची फोर्ड गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. दता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही … Read more

वजनातील काटामारी तसेच ऊस तोडीसाठी पैशांच्या मागणीसाठी ‘या’ कारखान्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अथणी तालुक्यातील केंपवाड येथील कारखान्यावर वजनातील काटामारी व तोडीस पैसे घेणे व कारखान्याच्या राखेमुळे द्राक्ष बाग व अन्य पिकांचे नुकसान होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, साखर आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली … Read more