पर्यटन राजधानीतील पर्यटनस्थळे आजपासून उघडणार

tourist

औरंगाबाद – पर्यटन राजधानीतील सर्व पर्यटन स्थळे आजपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल दिली. कोरोना प्रतिबंधक लसीचा 2 मात्रा घेतलेल्या व ऑनलाइन तिकीट बुकिंग केलेल्या पर्यटकांना पर्यटन स्थळांमध्ये प्रवेश दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. शासनाने 1 फेब्रुवारीपासून पर्यटन स्थळ, नॅशनल पार्क, सफारी पार्क, स्पा, सलून बाबत … Read more

प्रशासन गांधारीच्या भूमिकेत : जागतिक वारसा स्थळ कास बनलं अतिक्रमण स्थळ?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जागतिक वारसा लाभलेल्या कास पुष्प पठार म्हणजे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. यामुळे या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक फिरायला येतात. पण याच जागतिक वारसा स्थळाला खालसा‌ करण्याचे काम धनदांडग्यानी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी परवानगी नसताना देखील प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असलेलं दिसते. प्रशासनातील भ्रष्ट … Read more

…अन अजिंठ्यात पर्यटकांनी केली बैलगाडीतून सफर

ajintha

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.याचा मोठा फटका प्रवासी आणि पर्यटकांना बसत आहे. आज सकाळी अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची बस बंद असल्याने मोठी गैरसोय झाली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी बैलगाडीची व्यवस्था केल्याने पर्यटकांना लेणींमध्ये जाण्यासाठी बैलगाडीची सवारी मिळाली. एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण … Read more

पर्यटकांसाठी खुशखबर ! जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

tourist

औरंगाबाद – पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे शनिवार व रविवारी देखील खुली राहणार आहेत. म्हणजेच आता जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पूर्णवेळ खुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी, अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे सुर्योदय … Read more

भारतीय पुरातत्व विभागाकडून आकारण्यात येणारे विद्युत शुल्क रद्द

Ajanta caves

औरंगाबाद | भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अजिंठा लेणी पाहण्यासाठी प्रवेश शुल्क सोबत लागणारे असली तर विद्युत शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अजिंठा लेणी दर्शनासाठी फक्त चाळीस रुपये शुल्क आकारला जाणार आहे. आतापर्यंत अजिंठा लेणी च्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांकडून चाळीस रुपये तिकीट आणि विद्युत शुल्क पाच रुपये असे पाणी चाळीस रुपये आकारण्यात येत … Read more

जिल्ह्यातील पुराणवस्तुंचे जतन व संवर्धन करुन ऐतिहासाहिक स्थळांचे सुशोभिकरण करा-खा. इम्तियाज जलील

Tourist

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयास आज भेट देवुन विभागाच्या अंतर्गत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पुराणवस्तुंचे जतन व संवर्धन करण्यावर भर देवुन ऐतिहासिक स्थळांचे सुशोभिकरण करण्याच्या कामास गती देण्याच्या सुचना अधिक्षक मिलन कुमार चौले यांना केल्या. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात जगप्रसिध्द … Read more

ऐतिहासिक मकबऱ्या समोरील अडीच एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविले; महिलेने जेसीबी अडविताच पोलिसांनी घेतले ताब्यात

Encroachment

औरंगाबाद | ऐतिहासिक बिबी-का-मकबऱ्यासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सुमारे अडीच एकर जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी जमीनदोस्त केले. या जागेवर दोन शाळा सुरू होत्या तसेच टपऱ्या, सिमेंटचे खांब लावून जागेचा ताबा घेण्यात आला होता. ही जागा मोकळी करून जागेचा ताबा पुरातत्त्व विभागाला देण्यात आला आहे. यावेळी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत एका महिलेने जेसीबी अडवून … Read more

पर्यटनस्थळे सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

tourist

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. मात्र सर्व निर्बंध रूग्णसंख्या घटल्याने शिथिल करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यटन स्थळे सुरु झाली आहेत. यामुळे पर्यटणासाठी आलेल्या नागरिकांसोबतच विक्रेत्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद या शहरातील पाणचक्की, बीबीका मकबरा, दौलताबाद, वेरूळ-अजिंठा लेणी यासह सर्व पर्यटनस्थळे हे सुरु … Read more

भारत दर्शनासाठी पर्यटकांची पसंती आता ‘ताज’ नव्हे , तर आहे ‘जोधपूर’

काही काळापूर्वी आग्रा ही परदेशी पर्यटकांची भारतात येण्याची पहिली पसंती असायची पण आता प्रफुल्लीच्या बाबतीत ही स्फूर्ती मागे पडत आहे . अधिक विदेशी पर्यटक आता आग्राऐवजी राजस्थानमधील जोधपूरला जाण्यास प्राधान्य देतात.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला तब्बल २६ लाख पर्यटकांनी दिली भेट

गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात २६ लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. यामुळे आतापर्यंत तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. येत्या काही दिवसांत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.