हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या फेडरल अपीलीय कोर्टाने आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला एक मोठा धक्का दिला . कोर्टाने TCS वरील ट्रेड सीक्रेट चोरी प्रकरणात (trade secret theft lawsuit) खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र, फेडरल कोर्टाच्या अपीलने विस्कॉन्सिनच्या खालच्या कोर्टाने TCS वर लादलेला दंड जास्त असल्याचे सांगून खालच्या कोर्टाला ते कमी करण्यास सांगितले आहे. शुक्रवारी TCS ने रेग्युलेटरी फाइलिंग दरम्यान ही माहिती शेअर बाजाराला दिली.
आता काय होईल? – TCS ने म्हटले आहे की ते इतरही पर्याय शोधत आहेत, कारण असा विश्वास आहे की कंपनीने Epic systems च्या Intellectual Property Rights चा गैरवापर केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही आहे.
संबंधित कोर्टासमोर TCS जोरदारपणे आपल्या पदाचा बचाव करेल. TCS ने Intellectual Property Rights चोरले आणि प्रोडक्ट तयार केले असल्याचा आरोप Epic systems ने केला.
या प्रकरणात कोर्टाने पहिले TCS वर 940 मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला, त्यानंतर तो 2016 मध्ये कमी करुन 420 मिलियन डॉलर्स झाला, त्यामध्ये Compensatory Damages म्हणून दिलेल्या 14 कोटी डॉलर्सचा समावेश आहे. 2016 च्या या निर्णयाच्या विरोधात TCS ने अमेरिकेच्या फेडरल अपील कोर्टात याचिका दाखल केली.
TCS ने याबाबत म्हटले आहे की, अपीलीय न्यायालयाने अमेरिकन हेल्थकेअर सॉफ्टवेयर कंपनी एपिक सिस्टम्स (Epic systems) वर Intellectual Property Rights प्रकरणात त्यांच्यावर लावण्यात आलेल्या 28 कोटी डॉलर्स (सुमारे 2100 कोटी रुपये) दंडाची घटनात्मक आधारावर चौकशी केली आणि असा निर्णय दिला की कंपनीवर लादलेल्या भरपाईची रक्कम कमी केली जावी.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.