हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कॅशचा वापर कमी केला आहे. ज्यामुळे डिजिटल बँकिंग सर्व्हिसेसचा वापर वाढला आहे. हे पाहता बर्याच बँकांनी व्हॉट्सअॅपशी हातमिळवणी केली आहे. आता या मेसेजिंग अॅप्सद्वारे ग्राहकांना मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गोष्टी बँक आणि व्हॉट्स अॅप या दोघांसाठी फायदेशीर सिद्ध होत आहेत. फेसबुकच्या मालकीच्या सोशल मीडिया कंपनीने काही मोठ्या बँकांशी आपली सध्याची पार्टनरशिप पुढे सुरूच ठेवलेली आहे. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे. या बँका त्यांच्या सेवा अॅपद्वारे ग्राहकांना देतील.
अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) इंटीग्रेशनमुळे बँकांना बॅलन्स इन्क्वायरी, रुटीन अपडेट्स, मॉरटोरियम सुविधा, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट आणि काही बाबतींत बचत खाते उघडणे या मूलभूत सेवा देण्यात मदत झाली आहे.
लॉकडाउनमुळे अशा सेवांसाठी ग्राहकांची मागणी वाढली
देशभरातील लॉकडाऊनमुळे अशा सेवांची मागणी वाढली आहे. कारण असे आहे की या काळात बँकांच्या शाखा केवळ आवश्यक सेवाच प्रदान करीत आहेत. त्यामुळे स्वत: बँकानीदेखील ग्राहकांना या डिजिटल सेवा वापरण्यास प्रोत्साहित केले आहेत.
आयसीआयसीआय बँकेचे प्रमुख (डिजिटल चॅनेल अँड पार्टनरशिप) बिजित भास्कर यांनी ईटीला सांगितले की,’ग्राहकांच्या अभिप्रायामुळे आम्ही खूपच उत्सुक आहोत. हे लक्षात घेता आम्ही इंस्टेंट सेविंग अकाउंट ओपनिंग, लोन मोरेटोरियम निवडणे यासारख्या सुविधा सुरु केलेल्या आहेत.
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी दीपक शर्मा म्हणाले की, पूर्वी बँका या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एसएमएस आणि आयव्हीआर वापरत असत. ही सुविधा आता व्हॉट्सअॅपवर अपग्रेड केली गेलेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.