औरंगाबाद | प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या वेदांत्नगर पोलिसांना क्रांती नगरातील जमावाने तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करा. आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे म्हणत धमकावले. या जमावाने गुन्हेगाराला पळवून लावत उपनिरीक्षकास सह कर्मचाऱ्यांना महिला व तरुणांनी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला याप्रकरणी एमआयएमचा पदाधिकारी अरुण बोर्डे सह पंचवीस ते तीस जणांविरुद्ध वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणवाडी तील फारूक कुरेशी शेख चाँद कुरेशी यांनी 29 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घराबाहेर सिगरेट ओढणाऱ्या निखिल बोर्डे अजय रावत आणि अजय खरात यांना मनाई केली होती. त्यावेळी आलेल्या टोळक्याने कुरेशी व त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण करून चाकूने वार केले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी रविवारी दुपारी वेदांत्नगर ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद देवकते सचिन संपकाळ व इतर कर्मचारी क्रांती नगरातील कमानी जवळ गेले किंवा गुन्हेगाराला पकडताच जमाव एकत्र आला.
यातील महिला व तरुणांनी देवकते व संपा यांना धक्काबुक्की सुरू केली. काही वेळातच माजी नगरसेविका चापती आणि एमआयएमचा पदाधिकारी अरुण बोर्डे याच्यासह योगेश बोराडे अशोक बर्डे तुषार बोर्डे प्रदीप बोर्डे रमाकांत इंगळे निलेश्वर ठे सह पंचवीस ते तीस जणांचा जमाव पोलिसावर चालून आला देवकते जमावाला समजावून सांगत होते. मात्र जमावाने गुन्हेगाराला पळवून लावले. त्यामुळे पोलिस आणि जमावात वाद सुरू झाला. त्यानंतर दुपारी अरुण बोर्डे सर शेकडोंचा जमाव पोलीस आयुक्तालयात दाखल झाला होता. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी वेदांत नगर पोलिस ठाण्यात पंचवीस ते तीस जणांचा जमाव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”