हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले आहे. सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार कामगार दिनाच्या निमित्ताने मोदी सरकार आपल्या कामगारांची काळजी घेत नाही. बसमधून लोकांना येण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल.
माध्यमांशी बोलताना सिंघवी म्हणाले की, बिहारमधले जवळपास २५ लाख लोकं महाराष्ट्र तसेच तमिळनाडूमध्ये अडकले आहेत तर दुसरीकडे राजस्थानातील अडीच लाख, केरळचे ४ लाख, पंजाबचे ४ लाख, ओडिशाचे ७ लाख, आसाममधील दीड लाख देशाच्या विविध भागात अडकले आहेत. या लोकांना बसमधून बाहेर काढण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल. त्यांनी केंद्र सरकारच्या या आदेशास मनमानी आणि तुघलकी फर्मान असे म्हटले आहे. लोकांना परत आणण्यासाठी ट्रेन हाच एक उत्तम पर्याय आहे. ते पुढे म्हणाले की लॉकडाऊनचा आदेश देण्यापूर्वी केंद्र सरकार आपला गृहपाठ नीट करत नाहीयेत . त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवर राज्यांना निधी न दिल्याचा आरोपही केला आहे. लॉकडाऊनसाठीही सिंघवी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की डोंगर पोखरून उंदीर निघाला ….या ४० दिवसांच्या लॉकडाउननंतरही देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या ही वाढतच आहे.
गृह मंत्रालयाचा आदेश काय आहे?
इतर राज्यातील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांना माघारी आणणे ही सरकारची सर्वात मोठी समस्या आहे.यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना गुरुवारी गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली. ज्याअंतर्गत राज्य सरकार इतर राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढू शकते. यासाठी कोणतीही विशेष ट्रेन चालविली जाणार नाही. त्यांना फक्त बसमधून आणले जाईल. यावेळी, बसेसमधील सोशल डिस्टेंसिंग हे पूर्णपणे पाळले जाईल. तसेच, आपापल्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन केले जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.