हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील किंग एडवर्ड मेमोरियल या हॉस्पिटलचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शुक्रवारी सकाळी काही रुग्ण जमिनीवरच झोपी गेलेले दिसत आहेत. भाजपचे नेते राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेडच उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना जमिनीवरच झोपावे लागले, असा आरोप या भाजप नेत्याने केला आहे.
#KEM hospital today 11.45 am .. video . you can see how no of patients are siting on ground ? No medical help ? Nothing ? So sad . Wil maharashtra govt wake up ? @OfficeofUT @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 pic.twitter.com/HzA8WBQLwR
— Ram Kadam (@ramkadam) May 15, 2020
हा व्हिडिओ शेअर करताना, भाजप नेते असलेले राम कदम यांनी लिहिले की, ‘सकाळी ११:४५ वाजताचा केईएम हॉस्पिटल मधला व्हिडिओ. आपण पाहू शकता की किती रुग्ण जमिनीवरच झोपले आहेत ? त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत दिली गलेली नाहीये. काहीच नाही ? खूप दुखावलोय. महाराष्ट्र सरकार आतातरी जागे होईल का? ‘
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.