हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणामध्ये एका फॅशन डिझायनरने आपल्या घराच्या बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एक तरुण तिला मेसेज करून त्रास देत असे. मुलीच्या कुटुंबीयांना हे कळताच त्यांनी मुलीच्या निधनानंतर आरोपी तरूणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे नाव परनीत कौर आहे. निफ्ट चंडीगड महाविद्यालयात ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. लॉकडाऊनमुळे ती मार्चमध्ये घरी आली आणि ऑनलाईन शिकत होती. मुलीचे वडील म्हणाले, ’29 जून रोजी मुलगी सकाळपासूनच अस्वस्थ दिसत होती. माझा मुलगा सकाळी 11 वाजता पानीपतला गेला. मी पण पानिपतला गेलेलो होतो. मी पानिपतला पोहोचलो तेव्हा मला बायकोचा फोन आला की आपल्या मुलीने बाथरूममध्ये गळफास घेतलेला आहे, लवकर या.
परनीतचे वडील पुढे म्हणाले की, ‘माझ्या मुलाने स्कायलाईटचे ग्लास तोडून बाथरूमच्या दारातून मुलीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर, त्याने दरवाजा उघडला आणि मृतदेह बाथरूमच्या बाहेर काढला. तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मुलीच्या मोबाइलवर वासू चौहान नावाच्या युवकाचे रोज मेसेजेस येत असत. पण तो कोठे राहतो आणि तो कोण आहे हे आम्हाला कोणालाच ठाऊक नव्हते. ” वासू चौहान बरोबरच त्याची बहिण कुटुंबातील अन्य सदस्यांनी आमच्या मुलीचा इतका छळ केला की तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.’
अशा प्रकारे परनीतच्या कुटुंबीयांनी वासु आणि त्याच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे परनीतच्या भावाने सांगितले. त्याचबरोबर पोलिसांचे म्हणणे आहे की आम्ही मृतकाच्या मोबाइलवर मेसेजेसचे शॉट्स तपासासाठी पाठविले आहेत. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी आरोपी युवकाचा मोबाइल सध्या बंद येत आहे, तो कदाचित पळून गेला असावा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.