हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वे 80 स्पेशल गाड्या चालवणार आहे. या नवीन IRCTC स्पेशल गाड्यांचे बुकिंग किंवा रिझर्व्हेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वी भारतीय रेल्वेने मे महिन्यात पहिल्यांदाच IRCTC स्पेशल गाड्या सुरू केल्या. जूनमध्ये रेल्वेने जूनमध्ये 30 AC IRCTC स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस आणि 200 स्पेशल ट्रेन सर्व्हिसेस सुरु केलेल्या होत्या. त्या काळापासून भारतीय रेल्वे या 230 IRCTC स्पेशल गाड्यांची मागणी आणि त्यामधील प्रवाशांची संख्या यावर लक्ष ठेवून आहे. आपण या स्पेशल गाड्यांचे बुकिंग कसे करू शकता आणि ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल हे जाणून घेउयात.
या स्पेशल ट्रेनची तिकिटे कशी बुक करायची ?
कोरोना साथीच्या वेळी, तिकिट काउंटरवर देखील तिकीट बुक करता येतात पण सध्या कोरोनाचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत आपण घरातूनच सुरक्षितपणे ऑनलाइन irctc.co.in वरून ट्रेनचे तिकिट बुक करू शकता.
> यासाठी आपण पहिले IRCTC च्या वेबसाइटवर जा: irctc.co.in किंवा त्याचे ऍप डाउनलोड करा
> IRCTC वेबसाइटला भेट दिल्यानंतर IRCTC अकाउंट तयार करण्यासाठी वेबसाइटच्या वरच्या उजव्या कोपर्यातील ‘रजिस्टर’ या बटणावर क्लिक करा.
> यानंतर नाव, पासवर्ड, पसंतीची भाषा, नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता, पत्ता इत्यादी सारखी काही माहिती आपल्याला भरावी लागेल. यानंतर सबमिटवर क्लिक करा. हे आपले IRCTC अकाउंट तयार करेल.
> त्यानंतर आपण होमपेज वरील लॉगिन बटणावर क्लिक करा.
> आपण योर टिकट पेज पर जा आणि जिथून प्रवास करू इच्छित आहात ते ठिकाण टाकावे लागेल. तसेच आपल्याला कोणत्या दिवशी प्रवास करायचा आहे आणि आपण कोणत्या वर्गात प्रवास करू इच्छिता हे निवडून आपण तिकिटे बुक करण्यास पुढे जाऊ शकता.
> या नंतर त्या वर्गात आपली सीट आहे का ते आपण पाहू शकता.
> सीटस उपलब्ध असल्यास आपण तिकिटे बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला बुक नाउ या बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर ज्यांच्यासाठी तिकिटे बुक केली जात आहेत त्या प्रवाशांची नावे द्यावी लागतील, .
> खाली स्क्रोल करा आणि मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरा. मग बुकिंग वर क्लिक करा.
> नंतर आपल्याला पैसे द्यावे लागतील, यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय पर्याय निवडू शकता.
> पैसे भरल्यानंतर आपण तिकिट डाउनलोड करू शकाल. आपल्याला आपल्या फोन नंबरवर एक एसएमएस देखील मिळेल.
प्रवास करण्यासाठी, या नियमांचे पालन करावे लागेल (Train Guidelines For Passengers)
> रेल्वेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्टेशनवर एंट्री ही केवळ कंफर्म तिकिटामार्फतच करता येते.
> प्रवाशांना प्रवासाच्या वेळेच्या जवळपास 90 मिनिटांपूर्वी स्टेशनवर पोहोचावे लागेल, जेणेकरुन थर्मल स्क्रिनिंगची प्रक्रिया सहजपणे पूर्ण होऊ शकेल.
> प्रवास करण्यासाठी आरोग्य सेतु ऍप डाउनलोड करणे सर्व प्रवाश्यांसाठी आवश्यक आहे.
> प्रवासादरम्यान रेल्वेकडून ब्लँकेट, बेडशीट, पडदे दिले जाणार नाहीत.
> ट्रेनमध्ये जाताना आणि प्रवासादरम्यान सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.
> रेल्वे स्थानकातील सर्व प्रवाश्यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून एसीम्प्टोमॅटिक कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे न दाखविणाऱ्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल.
> ट्रेनमध्ये प्रवेश करताना आणि प्रवासादरम्यान मस्क घालणे आवश्यक असेल.
80 गाड्यांची संपूर्ण लिस्ट
12 सप्टेंबरपासून भारतीय रेल्वेने चालविण्यात येणाऱ्या 80 IRCTC स्पेशल गाड्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”