धक्कादायक ! १४ वर्षांचा ‘हा’ मुलगा रचत होता दहशतवादी हल्ल्याचा कट; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील हॅम्पशायरमधील एका १४ वर्षाच्या मुलाला दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्याच्या आरोपाखाली पकडले गेले आहे. त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलाचे नाव उघड केलेले नाही. काउंटर टेररिझम पोलिसिंग साऊथ ईस्ट (सीटीपीएसई) म्हणाले की,” हा मुलगा हॅम्पशायरच्या ईस्टलीजचा आहे आणि ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखणारा तो सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे. शुक्रवारी या मुलाला हॅम्पशायर पोलिस अधिकाऱ्यांनी अटक केली. दहशतवादी घटनांना आळा घालण्यासाठी दहशतवाद कायद्याच्या कलम ४१ अन्वये गुप्तहेरांनी या मुलाला अटक केली आहे.

२२ जून रोजी वेस्टमिंस्टर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाईल
या आरोपी मुलाला पुढील सुनावणीसाठी २२ जून रोजी म्हणजेच सोमवारी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करणार आहे. या मुलाने इस्लामचा धर्म स्वीकारला होता. या मुलावर दहशतवादी हल्ल्याची तयारी केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे, इस्लामिक दहशतवाद कायदा २००६ च्या कलम ५ (१) (अ) लावण्यात आलेले आहे.

हॅम्पशायर पोलिसांनी सांगितले की तसे पाहिल्यास समाजाला कोणताही धोका नाही आहे. मात्र दहशतवादाशी संबंधित काही संशयास्पद हालचाली दिसल्यास लोकांनी त्याची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रमुखांनी केलेलं आहे.

स्फोटके बनविण्याचे संशोधन केल्याचा आरोप
पोलिसांनी सांगितले की या मुलावर असा आरोप आहे की तो स्फोटकं कशी बनवायची यावर संशोधन करीत असे आणि त्याने अनेक स्फोटक यंत्रांची निर्मितीही केली होती. याशिवाय या मुलाने एक व्हिडिओही रेकॉर्ड केला ज्यामध्ये तो म्हणाला की त्याला शहीद व्हायचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.