खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील बहुतेक शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाव्हायरस हे वटवाघूळ आणि पॅंगोलिनच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरला आहे.मात्र, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना अजूनही याबद्दल शंका असून या विषाणूचा नेमका जन्म कोठून झाला याचा शोध त्यांनी सुरू केला आहे. वस्तुतः सीआयए आणि इतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना असे काही पुरावे सापडले आहेत की ते कोरोना विषाणू हा वुहानमधील लॅबमध्ये बनवला गेल्याचे सूचित करीत आहेत.

सीएनएनच्या अहवालानुसार कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी असे बरेच सिद्धांत अस्तित्त्वात आले आहेत, परंतु सत्य काय आहे हे मात्र कोणालाही सांगता येणे अवघड आहे.अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी असा निर्णय घेतला आहे की कोणत्याही सिद्धांतावर अवलंबून राहण्याऐवजी या प्रकरणाची खऱ्या अर्थाने चौकशी करून खरी गोष्ट समोर आणणे महत्त्वाचे आहे.अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प समर्थकांनी चीनला दोष देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा बर्‍याच बनावट गोष्टी पसरवल्या आहेत.तरीही,त्यातील एक सिद्धांत असा आहे, ज्याची गुप्तचर संस्थांकडूनही चौकशी केली जात आहे.

तो सिद्धांत काय आहे ?
सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना अशाच एका सिद्धांताशी संबंधित काही पुरावे मिळाले आहेत.यानुसार, कोरोना चीनमधील कोणत्याही बाजारपेठेतून पसरलेला नाही,तर तो वुहान शहरातील एका लॅबमध्ये बनविला गेला आहे. या सिद्धांतानुसार कोरोना बायोवेपनसारखा विकसित होत होता परंतु एका छोट्याशा चुकीमुळे तो सामान्य नागरिकांच्या संपर्कात आला. लॅबमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला एक छोटासा अपघात झाला आणि त्याला याचा संसर्ग झाला. यानंतर, त्याच्याकडून नकळतपणे तो प्रयोगशाळेतील इतर लोकांना आणि वुहानच्या बाजारपेठेत पसरला गेला.सूत्रांच्या माहितीनुसार अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सी सध्या या सिद्धांताची चौकशी करत आहे.मात्र,जगभरात कोरोना पसरल्यानंतर, आता त्याचे मूळ शोधणे अत्यंत कठीण मानले जाते आहे.

जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष मार्क मिली यांनीही याची पुष्टी केली आहे की कोरोना लॅबमध्ये तयार आहे की नाही याची अमेरिकन संस्था चौकशी करीत आहेत. मार्क म्हणाले की या क्षणी असे वाटते की हा विषाणू नैसर्गिक आहे परंतु तरीही आम्हाला सर्वकाही तपासून याची पुष्टी करायची आहे. कोरोना चीनच्या लॅबमध्ये तयार असल्याची शंका प्रथम याहू न्यूज आणि फॉक्स न्यूजने व्यक्त केली होती आणि नंतर अध्यक्ष ट्रम्प यांनीही त्याचे समर्थन केले होते.

चीनने दिला आहे नकार
वुहानाच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे वृत्त चिनी सरकारने यापूर्वीच फेटाळून लावले आहे आणि इतर अनेक तज्ञ देखील या सिद्धांताशी सहमत नाहीत. चीनने ज्याप्रकारे आपल्या देशात कोरोनाला नियंत्रित केले आहे, ते पाहून असे वाटते कि या व्हायरसमुळे होणारे नुकसान आणि प्रतिबंधाबद्दल त्यांना अगोदरच माहिती होती याबद्दल शंका आहे.२०१८ मध्येच वॉशिंग्टन पोस्टने एक अहवालही प्रकाशित केला होता ज्यामध्ये वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी बायोलॅबवर गंभीर आरोप केले गेले.मात्र, चीनवर दोषारोप ठेवण्यासाठी अजूनही कोणतेही ठाम पुरावे अमेरिकेकडे नाहीत.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वुहानमधील बाजाराच्या चौकशीसाठी परवानगी मागितली होती जिथे कोरोना पसरल्याचा दावा केला जात आहे. चीनने हे नाकारले नसते, तर त्यावेळी विषाणूचा प्रसार जगात होण्यापासून रोखता आला असता. चीनच्या निष्क्रियतेपासून सर्व एजन्सींचा संशय अधिक तीव्र झाला आहे आणि आता या विषाणूची उत्पत्ती कोठून झाली हे शोधणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

Leave a Comment