नवी दिल्ली । विस्तारा एअरलाइन्स (Vistara Airlines) लवकरच मुंबई व लंडनसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. शुक्रवारी कंपनीने याबाबत माहिती दिली आणि सांगितले की, या मार्गावर बोईंग 787-9 ड्रीमलाइनर (Boeing 787-9 Dreamliner) विमानाचा वापर केला जाईल. मुंबई-लंडन दरम्यान ही सेवा 16 जानेवारी 2021 पासून सुरू होईल. विस्ताराने मुंबई-लंडन-मुंबई या फेरीसाठी 46,799 रुपये निश्चित केले आहे. तर लंडन-मुंबई-लंडन या फेरीसाठी हे 439 पाउंड इतके असेल.
यापूर्वीच ही कंपनी दिल्ली-लंडन मार्गावर बोईंग 787-9 ड्रीमलाईनर विमानसेवा देत आहे. आता कंपनीने ती विमानसेवा मुंबई-लंडन मार्गावर देखील सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. बोईंग 787-9 ड्रीमलाइनर हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले विमान आहे. हे विमान प्रवाश्यांना शानदार अनुभव देण्याचे लक्षात घेऊन तयार केले गेले आहे.
गेल्या आठवड्यातच या खासगी विमान कंपनीने दिल्ली ते दोहा विमान उड्डाण सुरू केले. याशिवाय 5 नोव्हेंबर 2020 रोजी दिल्लीहून बांगलादेशसाठी देखील विमानसेवा सुरू करण्यात आली.
आपण या प्लॅटफॉर्मवरुन तिकिटे बुक करू शकता
मुंबई आणि लंडन दरम्यानच्या या उड्डाणांचे बुकिंग कंपनीची वेबसाइट आणि मोबाईल अॅपसह सर्व प्लॅटफॉर्मवर करता येते, असे विस्ताराने सांगितले. या उड्डाणांचे बुकिंग वेबसाइट, विस्ताराच्या अँड्रॉइड आणि iOS मोबाइल अॅप्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीज आणि ट्रॅव्हल एजंट्सद्वारे करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोरोना व्हायरस (Corona Virus Pandemic) हा साथीचा रोग सर्वत्र पसरल्यामुळे मार्चपासून भारतात शेड्यूल्ड आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आल्या आहेत. परंतु भारताने जुलैमध्ये देशांमध्ये 17 अन्य देशांशी एअर-बबल करार (Air-Bubble Agreement) केला आहे जयादवारे स्पेशल पॅसेंजर फ्लाइट सेवा सुरु केली जाऊ शकेल.
अमेरिकन रूट्स वरही फ्लाइट्स सुरू करण्याची तयारी
त्यानंतर विस्ताराने इतर अनेक देशांमध्ये आपली उड्डाण सेवा सुरू केली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातही आता स्पेशल पॅसेंजर सेवा सुरू करण्याची कंपनीची तयारी आहे. या मार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कंपनी ही तयारी करीत आहे. आतापर्यंत फक्त एअर इंडिया ही एकमेव सरकारी विमान कंपनी भारत-अमेरिका दरम्यान कार्यरत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.