वाजिद खान यांच्या आईलाही कोरोनाची लागण 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन कार्डियाक अरेस्टने झाल्याचे साजिद खान यांनी स्पष्ट केले आहे. त्याआधी त्यांना किडनीशी संबंधित काही आजार होते. मात्र त्यांना कोरणाचे संक्रमण झाले होते. त्यांच्यासोबत रुग्णालयात त्यांची आई होती अशी माहिती समोर आली आहे. वाजिद यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांचे कोरोनाचे अहवाल सकरात्मक आले होते. मात्र त्यांच्या आईला आधीच कोरोनाची बाधा झाली होती अशी माहिती समोर आली आहे.

त्यांच्या आई रझिना यांची प्रकृती आता स्थिर आहे. वाजिद खान याना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे सर्व अहवाल सकारात्मक आले होते. दरम्यान दिवंगत वाजिद खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने केवळ २० लोकांनाच अंत्यसंस्काराला परवानगी देण्यात आली होती. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साजिद-वाजिद ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी होती. वाजिद यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. बॉलिवूडमधील मान्यवरांनी त्यांच्या सोशल मीडियावरून वाजिद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सलमान खान साठी या जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.