हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेच आहे. त्याचप्रमाणे देशातील अर्थव्यवस्था देखील ढासळते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथिल केले आहेत. कंटेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी आता हळूहळू गोष्टी सुरु केल्या जात आहेत. हे सर्व सुरु करत असताना सामाजिक अलगाव चे नियम मात्र बंधनकारक असणार आहेत. दुसरीकडे देशातील रुग्णसंख्या वाढतेच आहे. काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या पूर्वी कमी होती मात्र आता वाढते आहे.
पश्चिम बंगाल आणि मिझोराम या दोन राज्यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील संचारबंदी आणखी वाढविली आहे. केंद्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी देशातील रुग्णसंख्या काही कमी होत नाही आहे. केंद्र सरकारने नियमांसाठी राज्यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे आता या दोन राज्यांनी संचारबंदी वाढविली आहे.
शिथिल केलेल्या नियमामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या राज्यांची चिंता वाढवीत आहेत. स्थलांतरित मजूर आणि केंद्र सरकारने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यात करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. मिझोराममध्येही गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. म्हणून मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगायांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून संचारबंदी दोन आठवडे वाढविली असून विलगीकरणाचा कालावधी २१ दिवसांचा केला असल्याची माहिती दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.