हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक मुलाचे वर्ष वाया जाऊ नये किंवा मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सुरुवात केली आहे. अनेक शिक्षकांनी वेग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अशीच अनोखी क्लुप्ती वापरून एका महिला शिक्षक मुलांना शिकवण्याचे काम करत आहे.
घरात अनेक वेगवेगळ्या वस्तू पडल्या असतील पण त्या कधी , कुठे आणि केव्हा उपयोगी पडतील हे मात्र कोणी सांगू शकत नाही. या शिक्षिकेने चक्क फ्रिज चा ट्रे शिकवणीसाठी वापरला आहे. त्यामुळे अनेकांना या ट्रे चा असाही वापर होऊ शकतो हे पाहिलांदाच समजले असेल . अनेक जणांनी या फोटो ला लाइक आणि शेअर केले आहे.अनेक ठिकाणी डिजिटल माध्यमाचा वापर करून शिकवणी सुरु झाल्या आहेत. या काळात अनेक मुलांना वेगवगेळ्या प्रकारे सामोरे जावे लागले आहे. ऑनलाईन शिकवणी म्हणजे अनेक वस्तूंची जुळवाजुळव करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तर कॉम्पुटर, लॅपटॉप या सारख्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून ,मुलांना शिकवण्याचे काम सुरु आहे.
Teacher’s attempt of trying her best for teaching shared by @TimesNow. Hoping that I get to find her. #Teachers ????
— Monica Yadav (@yadav_monica) August 9, 2020
हा फोटो मोनिका यादव या व्यक्तीने ट्विटर वरून शेअर केला आहे. परंतु हा फोटो कुठला आणि केव्हा काढला याची माहिती मिळाली नाही या फोटोमध्ये शिक्षिकेने दोन डब्यांचा पण वापर केला आहे. तसेच आडवा मोबाइल त्या काचेच्या ट्रे वर ठेवून त्या शिकवत आहेत. या फोटोवर अनेक जणांनी कंमेंट दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in