Google Play Store वरून हटवल्यानंतर आता मोबाईल फोनमध्ये बंद होणार Paytm App, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपणही Paytm अॅप देखील वापरत असाल तर ही बातमी आपल्याला त्रास देऊ शकते. कारण लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप Paytm Google Play Store वरून काढून टाकण्यात आले आहे. यानंतर आता युझर्सना हे अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र Paytm सर्च केल्यानंतर Paytm for business, Paytm money, Paytm Mall हे अद्यापही Play Store वर उपलब्ध आहेत. याशिवाय आम्ही अॅपल अॅप स्टोअरवर हे तपासले असता हे अॅप तेथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आता प्रश्न असा पडतो आहे की युझर्स आता पुन्हा त्याचा वापर करू शकणार नाहीत का?

पेटीएम केवळ Google Play Store वरूनच काढले गेले आहे, मात्र आपण जर आयफोन युझर्स असाल तर हे अॅप अॅपल स्टोअर उपलब्ध आहे. मात्र जर Paytm आपल्या फोनमध्ये आधीपासून अस्तित्वात असेल तर आपण तरीही ते वापरू शकता.

चला तर मग जाणून घेउयात की, या अॅपच्या मदतीने केवळ रिचार्जच केले जात नाही तर ते छोट्या ते मोठ्या पेमेंट पासून ते शॉपिंग आणि इन्वेसमेंटपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी या अॅपचा भरपूर वापर केला जातो.

गुगलने म्हटले आहे की,’प्ले स्टोअरवर भारतात ऑनलाइन कॅसिनो आणि स्पोर्ट्स सट्टेबाजीच्या अॅप्सना परवानगी नाही. या संदर्भात, Paytm सतत प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे. Paytm ही भारतातील सर्वात मूल्यवान स्टार्टअप आहे आणि असा दावा आहे की, यात 5 कोटी मंथली एक्टिव यूजर्स आहेत. एकमेकांशी पैशाचे ट्रान्सफर सुलभ करणारे Paytm अॅप आज Play Store वरून काढण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like