हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढतच आहे. जॉन्स हॉपकिन्स कोरोनाव्हायरस ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार या प्राणघातक आजाराने बाधित झालेल्या लोकांची संख्या पाच लाख ५० हजारांपर्यंत गेली आहे.या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत या साथीच्या आजारामुळे केवळ १५१४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोना या साथीच्या आजाराने पीडित लोकांची संख्या ५,५५,००० ओलांडली आहे, तर आतापर्यंत २२,२२२ पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातून नुकतेच डिस्चार्ज देण्यात आला आहे. डाऊनिंग स्ट्रीटच्या हवाल्याने एएफपीने ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूने बाधित बोरिस जॉन्सन यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) दाखल केले होते.१० एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले गेले.
ब्रिटनमध्ये ९.५ हजारहून अधिक मृत्यू
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची सुमारे १८ लाख प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. त्याचवेळी जवळपास १ लाख १० हजार लोक मरण पावले आहेत. ब्रिटनमध्ये ७८ हजाराहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहेतर ९ हजार ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे.
जागतिक आकडेवारी
आतापर्यंत जगातील बहुतेक देशांवर परिणाम झालेल्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे जगभरात झालेल्या मृत्यूची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स कोरोनाव्हायरस ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार जगभरात कोरोनाव्हायरसमुळे १,१४,००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यावेळी इटलीमध्ये १९८६८, स्पेनमध्ये १७२०८, फ्रान्समध्ये १४३९३ आणि युनायटेड किंगडममध्ये १०६१२ मृत्यूंचा समावेश आहे. आतापर्यंत, जगभरात १८,००,००० पेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे, त्यापैकी ४,२०,००० पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
दहावीचा भुगालाचा पेपर रद्द; ९वी, ११वी ची दुसरे सेमिस्टरही रद्द – वर्षा गायकवाड#Careernama #career #ssc #COVID__19 #coronavirus https://t.co/Qo0mwHdiv2
— Careernama (@careernama_com) April 12, 2020
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
a