मुंबई । गेल्या ३-४ दिवसात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु होती. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक तेवढ्या रेल्वे पुरविल्या गेल्या नाहीत असा आरोप करताना पाहण्यात आले. तर दुसरीकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व प्रवाशांची सातत्याने मागणी केल्याचे दिसून आले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोयल यांना चांगलाच दम देखील भरला होता. शेवटी आज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र सरकारने पश्चिम बंगालसाठी विशेष ४१ श्रमिक रेल्वेची मागणी केली आहे. ज्या आज निघण्याची शक्यता आहे. मात्र पश्चिम बंगाल मध्ये आलेल्या Amphan चक्रीवादळामुळे परिस्थिती बिघडलेली असल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने या रेल्वे पश्चिम बंगाल मध्ये घेण्याची समस्या असल्याचे सांगितले आहे. ही माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र सरकारला पश्चिम बंगाल सरकारसोबत हा मुद्दा सोडवावा अशी विनंती ही केली आहे. राज्यातून इतर ठिकाणीही रेल्वे आज जाणार आहेत.
145 trains being run from Maharashtra today: Railway Ministry sources
— ANI (@ANI) May 26, 2020
या राजकीय टीका-टिपण्णी, दमदाटी असे सर्व प्रकार रेल्वेच्या मुद्द्यावरून झाल्याचे दिसून आले आहे. तसे महाराष्ट्रात दररोज एक नवा राजकीय मुद्दा समोर येतो आहे. आता या १४५ रेल्वेनंतर कोणता राजकीय मुद्दा समोर येतो हेही पाहण्यासारखे असेल. राज्याच्या विविध भागातून या रेल्वे सुटतील. पण जेव्हा त्या इप्सित स्थळी पोहोचतील तेव्हाच हे सफळ संपूर्ण होईल असे दिसते आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.