70 लाख शेतकर्‍यांना ‘या’ चुकांमुळे नाही मिळाले पंतप्रधान-किसान योजनेचे 2000 रुपये, कसे ठीक करायचे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला अंदाजही नसेल एका स्पेलिंगमधील चूक ही 70 लाख शेतकर्‍यांवर इतकी भारी पडेल आणि नेमके हेच घडले. कागदपत्रांमधील याच गडबडीमुळे शेतकर्‍यांचे सुमारे 4200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत ही चूक सुधारली जात नाही तोपर्यंत आता इतक्या मोठ्या संख्येने शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पैसा मिळू शकणार नाही.

चूक कुठे झाली?
पंतप्रधान किसान योजनेच्या अर्जदारांचे नाव आणि बँकेच्या खाते क्रमांकामध्ये चूक झाली आहे. बँक खाती आणि इतर कागदपत्रांमध्ये नावाचे स्पेलिंग वेगवेगळे आहे. ज्यामुळे या योजनेची ऑटोमेटिक सिस्टम त्याला पास करू शकत नाही. या पंतप्रधान किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी एका न्यूज चॅनेल्सशी बोलताना सांगितले की, ‘अशा प्रकारची गडबड करणाऱ्या अर्जदार शेतकर्‍यांची संख्या सुमारे 70 लाख इतकी आहे. तर जवळपास 60 लाख लोकांच्या आधार कार्डमध्ये गोंधळ आहे.

 वेरीफिकशन के लिए पेंडिंग हैं सवा करोड़ केस: मतलब स्कीम के पैसे के लिए अप्लाई करने के बावजूद देश भर के करीब 1.3 करोड़ किसान सालाना 6000 रुपये के लाभ से वंचित हैं. कई जिले ऐसे हैं जहां पर सवा-सवा लाख किसानों का डेटा वेरीफिकेशन के लिए पेंडिंग है. जब राज्य सरकार किसान के डाटा को वेरीफाई करके केंद्र को भेजती है तब जाकर किसान को पैसा मिलता है.

व्हेरिफिकेशनसाठी प्रलंबित आहेत करोडो प्रकरणे
देशभरातील सुमारे 1.3 कोटी शेतकरी हे वार्षिक 6000 रुपयांच्या लाभापासून वंचित आहेत. असे अनेक जिल्हे आहेत जिथे डेटा व्हेरिफिकेशनसाठी दीड लाख शेतकरी प्रलंबित आहेत. जेव्हा राज्य सरकार शेतकर्‍यांचा डेटा व्हेरिफाय करुन ते केंद्राकडे पाठवते तेव्हाच शेतकऱ्याला पैसे मिळतात.

चूक कशी दुरुस्त होईल?
सर्वप्रथम पंतप्रधान-किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा. त्याच्या फार्मर कॉर्नरवर जा आणि Edit Aadhaar Details ऑप्शनवर क्लिक करा. आपल्याला येथे आपला आधार क्रमांक भरावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड भर आणि सबमिट करा. खाली दाखविल्याप्रमाणे. आपले केवळ नावच चुकीचे असल्यास, म्हणजेच आपले नाव अप्लीकेशन आणि आधारात वेगवेगळे आहे तर आपण ते ऑनलाइन नीट करू शकता. इतर काही चूक असल्यास आपल्या लेखपाल व कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.