टीव्हीवर सतत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून १७ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहार मधील पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या टीव्हीवर सतत दाखविण्यात येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या पाहून एका १७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि ती परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होती. मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केलं.

मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, “दहावीची परीक्षा चागंली न गेल्यामुळे ती सध्या सतत तणावाखाली होती. सुशांत सिंग याने आत्महत्या केल्याच्या बातम्या ती सतत टीव्हीवर पाहत होती. तसेच सोशल मीडियावरही त्याच्याबद्दलचेच सर्व व्हिडीओ ती बघत होती. मी तिला अशा बातम्या पाहू नको से वारंवार सांगत होते पण ती मात्र कोणाचेही ऐकायला तयार नव्हती”.

अशातच काही कामासाठी आई घरातील गच्चीवर गेली असता या मुलीने बेडरुममध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर या मुलीच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने तिचा मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात धाव घेतली. पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment