कौतुकास्पद! रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सोशल मीडियावर सतत कार्यरत असणारे जेनेलिया आणि रितेश देशमुख हे नेहमीच आपले सामाजिक भान जपताना दिसून येतात. समाजातील अनेक मुद्द्यांवर ते संवेदनशीलपणे आपले मत मांडत असतात. मदतीचा हात पुढे करत असतात. त्याचबरोबर ते अनेक समाजोपयोगी कार्याशी जोडलेले देखील आहेत. आज आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून जेनेलियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या दांपत्याने आम्ही अवयव दानाची प्रतिज्ञा केली असल्याचे म्हंटले आहे. त्यांनी सर्वाना ही प्रतिज्ञा करण्याचे आवाहन केले आहे.

जेनेलियाने म्हंटले आहे, रितेश आणि मी बर्‍याच काळापासून याबद्दल विचार करत होतो परंतु दुर्दैवाने ते करता आले नाही. आज डॉक्टर डे दिवशी आम्ही आमच्या अवयवांचे दान करण्याची प्रतिज्ञा करतो आहोत. आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेअरी आणि एफओजीएसआयचे आभार मानू इच्छितो. आपण एखाद्यास देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे ‘जीवनाची भेट’ आहे. आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की या आरंभात तुम्हीही सहभागी व्हा आणि एखादा जीव वाचविण्याची प्रतिज्ञा करा, आपल्या अवयवांचे दान करण्याची प्रतिज्ञा करा.

 

आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने या दांपत्याने अवयव दानाची प्रतिज्ञा केली आहे. मृत्यूनंतर आपले अवयव गरजू रुग्णाला देण्याची ही प्रतिज्ञा आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या अवयवांचे आणि ऊतींचे दान केल्यास आपण ७५ किंवा अधिक लोकांचे जीवन वाचवू किंवा सुधारू शकतो. अनेकांनी आपल्या कुटुंबातील लोकांनी अवयव दान केल्याने एखाद्याचे जीवन सुधारल्याचा अनुभव घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment